दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याला काही तास शिल्लक असताना आता दिल्ली कॅपिटल्स संघ चांगलाच अडचणीत सापडला आहे. दिल्लीच्या एका गोलंदाजाला करोनाची लागण झाल्यानंतर दिल्लीचाच दिग्गज खेळाडू पृथ्वी शॉ आजारी असल्याचं समोर आलं आहे. अंगात ताप भरल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

हेही वाचा >> राजस्थानच्या शिमरॉन हेटमायरचा मोठा निर्णय, आयपीएल सोडून परतला मायदेशी, कारण काय?

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात आज सायंकाळी ७.३० वाजता दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील सामन्याला सुरुवात होणार आहे. सामन्याला काही तास शिल्लक आहेत. दोन्ही संघांनी आपली तयारी पूर्ण केलेली आहे. मात्र दिल्लीचा खेळाडून पृथ्वी शॉ अचानकपणे आजारी पडला आहे. अंगात ताप भरल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तो लवकरच बरा होऊन पुन्हा एकदा संघात सामील होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. मात्र सामना तोंडावर आलेला असताना दिग्गज फलंदाज पृथ्वी शॉ आजारी पडला आहे.

हेही वाचा >> पुन्हा भोपळा! विराट कोहली शून्यावर बाद, गोल्डन डकवर आऊट होण्याची तिसरी वेळ

गोलंदाजाला करोनाची लागण

मिळालेल्या माहितीनुसार चेन्नईविरोधातील सामन्याआधी दिल्लीच्या नेटमध्ये सराव करणाऱ्या गोलंदाजाला करोनाची लागण झाली आहे. या गोलंदाजासोबत ज्या खेळाडूंनी रुम शेअर केलेली आहे, त्या सर्वांनाच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. एकीकडे पृथ्वी शॉ आजारी पडला आहे तर दुसरीकडे संघासमोर करोनाचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे दिल्ली संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.

हेही वाचा >> Delhi Capitals Corona : दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजाला करोनाची लागण, सामन्याला काही तास शिल्लक असताना संघ अडचणीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या हंमातील ५५ वा सामना दिल्ली आणि चेन्नई या दोन संघांमध्ये आज सायंकाळी ७.३० वाजता मुंबईतील डीवाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.