एलिमिनेटर सामन्यात आऱसीबीचा संघ प्रथम फलंदाजी करत आहे. पण बंगळुरू संघाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत आरसीबीच्या धावांना वेसण घातले आहे. अश्विनने एका षटकात दोन मोठे विकेट घेत संघाला चांगलाच धक्का दिला. आवेश खानलाही एका षटकात दोन विकेट्स मिळाल्या असत्या पण राजस्थानचा संघ पुन्हा एकदा वादग्रस्त निर्णयाचा बळी ठरल्याचे दिसत आहे.

आऱसीबीचा रजत पाटीदार चांगल्या फॉर्मात होता आणि फटकेबाजी करत होता, तितक्यात १५ वे षटक टाकण्यासाठी आवेश खान आला होता, आवेशच्या पहिल्याच चेंडूवर रजतने षटकार लगावला. पण दुसऱ्याच चेंडूवर तो मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. यानंतर दिनेश कार्तिक फलंदाजीसाठी आला. त्याला आवेश खानने पहिल्याच चेंडूवर पायचीत केले. मैदानावरील पंचांनी दिनेश कार्तिकला बाद दिले. पण महिपाल लोमरोरसोबत चर्चा केल्यानंतर त्याने डीआरएसची मागणी केली आणि रिव्ह्यू एकदा पाहून तिसऱ्या पंचांनी कार्तिकला नाबाद दिले.

डीआरएसमध्ये पहिल्यांदा पाहता बॅटने चेंडूला आधी स्पर्श केला आणि मग पॅ़डवर आदळला, त्यामुळे कार्तिकला बाद दिले. पण जेव्हा पुन्हा रिप्ले पाहिला तेव्हा बॅट पॅडला लागली होती, त्यामुळे कार्तिक हा बाद होता. पण तोपर्यंत पंचांनी कार्तिकला नाबाद घोषित केले होते. पंचांच्या या चुकीच्या निर्णयामुळे राजस्थानला मोठी विकेट मिळाली नाही. समालोचन करत असलेल्या रवी शास्त्री आणि सुनील गावसकरांनीही आपली नाराजी स्पष्टपणे बोलत व्यक्त केली. बॅट चेंडूला नाही पॅडला लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. पंचांचा हा चुकीचा निर्णय आहे, असेही त्यांनी सांगितले.

यानंतर राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक आणि मेंटॉर कुमार संगकाराही उठून पंचांशी बोलण्यासाठी गेला. दिनेश कार्तिकला नाबाद दिल्यानंतर सर्व खेळाडू आश्चर्यचकित दिसले. सोशल मीडियावर चाहत्यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

PL 2024 चा एलिमिनेटर सामना राजस्थान रॉयल्स आणि RCB यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने राजस्थान संघाला १७२ धावांचे लक्ष्य दिले आहे.