Mohammed Shami reacts on Shubman Gill’s captaincy : आयपीएलच्या १७ व्या हंगामातील पाचव्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स आमनेसामने असणार आहेत. या सामन्यात गुजरातचे नेतृत्व युवा फलंदाज शुबमन गिल करणार असून मुंबईची धुरा हार्दिक पंड्याच्या खांद्यावर आहे. या सामन्यापूर्वी गुजरात टायन्सचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने शुबमन गिलच्या कर्णधारपदावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. मोहम्मद शमी अनफिट असल्यामुळे आयपीएलच्या या मोसमातून बाहेर आहे. शमीच्या मते गिलला ही जबाबदारी नक्कीच लवकर मिळाली पण एक दिवस ही जबाबदारी सांभाळायचीच होती.

गिलला इतक्या लवकर कर्णधारपदाची जबाबदारी मिळेल, अशी अपेक्षा नव्हती –

शुबमन गिल आयपीएलच्या गेल्या काही हंगामात सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. गिलकडे कर्णधारपदाची जबाबदारी आल्यावर क्रिकबझवर दिलेल्या आपल्या वक्तव्यात मोहम्मद शमी म्हणाला की, “गिलला इतक्या लवकर कर्णधारपदाची जबाबदारी मिळेल, अशी अपेक्षा नव्हती, पण त्याला एक दिवस ती जबाबदारी स्वीकारावी लागणारच होती. गेल्या मोसमात त्याने सातत्याने चमकदार कामगिरी केली आहे. कर्णधारपद मिळाल्यावर तुम्हाला जास्त दडपण घेण्याची गरज नाही, फक्त स्वत:ला सामान्य ठेवावे लागेल. ज्यामध्ये गिलने स्वतःला शांत ठेवून कामगिरीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”

यापूर्वी, गुजरातचा संघ त्याच्या पहिल्या दोन हंगामात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळला होता, ज्यामध्ये २०२२ मध्ये विजेतेपद पटकावले होते. या हंगामात प्लेयर ट्रेडिंग विंडो दरम्यान, हार्दिक त्याच्या जुन्या फ्रेंचायझीमध्ये परतला. त्यानंतर गुजरात फ्रँचायझीने शुबमन गिलला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल २४ मार्च रोजी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याने आयपीएलमध्ये कर्णधारपदाची सुरुवात करेल, ज्यामध्ये त्याच्यासमोर हार्दिक पंड्या असेल. गिलने यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटच्या काही सामन्यांमध्ये ही जबाबदारी पार पाडली आहे. गिलसाठी हा हंगाम फलंदाज म्हणून खूप महत्त्वाचा असणार आहे, ज्यामध्ये आगामी टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यावरही त्याची नजर असेल.

हेही वाचा – IPL 2024 : ‘कभी खुशी तो कभी गम’, ४ चेंडूत बदलल्या भावना; काव्या मारनची रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल

दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –

गुजरात टायटन्स: शुबमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), बी साई सुदर्शन, अजमतुल्ला ओमरझाई/केन विल्यमसन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, राशीद खान, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन, मोहित शर्मा. इम्पॅक्ट प्लेयर: आर साई किशोर

हेही वाचा – IPL 2024 : सीएसकेच्या समीर रिझवीने जिंकली सर्वांची मनं, विराट कोहलीबरोबरचा ‘तो’ VIDEO होतोय व्हायरल

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, रोमॅरियो मोहम्मद नबी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा, कुमार कार्तिकेय/आकाश मधवाल. इम्पॅक्ट प्लेयर: डेवाल्ड ब्रेविस