भारतीय क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा कर्णधारपदाचा उल्लेख केला जातो तेव्हा महेंद्रसिंग धोनीचे नाव प्रथम घेतले जाते, ज्याने भारताला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकवून दिल्या आणि या अर्थाने तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार होता. मात्र, आकडेवारीचा विचार करता धोनीचा उत्तराधिकारी विराट कोहली विजयाच्या टक्केवारीच्या बाबतीत धोनीच्या पुढे आहे. या दोघांनी आपापल्या कर्णधारपदाखाली भारताचा झेंडा जगभर फडकवला आणि अनेकांना आपल्या नेतृत्वक्षमतेची खात्री पटवून दिली.

आयपीएलच्या अस्तित्वामुळे अनेक परदेशी खेळाडूंनाही या दोघांच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळाली आणि आजही या दोघांच्या नेतृत्वाखाली खेळण्याची इच्छा असलेले अनेक खेळाडू आहेत. या यादीमध्ये सामील झालेला इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटनेही या दोघांच्या नेतृत्वाखाली खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राजस्थान रॉयल्सचा फलंदाज रूट याने दोन खेळाडूंमधून आपला आवडता कर्णधार निवडला असून ज्याच्या नेतृत्वाखाली त्याला खेळायचे आहे.

हेही वाचा: IPL2023: “विराट-गंभीर प्रकरणावर बीसीसीआयने…”, भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी केले सूचक विधान

जो रूटने एम.एस. धोनीला पहिली पसंती दिली

राजस्थान रॉयल्सच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, जो रूट त्याचे सहकारी देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेल यांच्यासह तो दिसत आहे. हे तिघे मिळून दिस आणि दॅट नावाचा गेम खेळत आहेत. गेममध्ये, त्या खेळात खेळ खेळणाऱ्याला दोन प्रश्नांसह दोन पर्याय दिले जातात, ते पाहून त्यांना उजवीकडे किंवा डावीकडे वळावे लागते. त्या व्हिडिओत अनेक प्रश्न विचारले गेले त्यात एक प्रश्‍न कर्णधाराव होता की, तुम्हाला कोणाच्या कर्णधारपदाखाली खेळायचे आहे, तर जो रूटने धोनीच्या पर्यायाकडे वळत आपली इच्छा व्यक्त केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माहितीसाठी, जो रूटचा राजस्थान रॉयल्सच्या प्रभावशाली खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला आहे, परंतु तो अद्याप मैदानात उतरलेला नाही. आयर्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी आणि अॅशेस मालिकेसाठी आयपीएल २०२३ मधून इंग्लंडचे खेळाडू लवकरच मायदेशी परततील. जर आपण चालू असलेल्या आयपीएल२०२३ मध्ये राजस्थानच्या कामगिरीबद्दल बोललो, तर संजू सॅमसनचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे आणि त्यांचा सामना आज म्हणजेच ५ मे रोजी गुजरात टायटन्सशी होणार आहे. हार्दिक पांड्याचा संघ सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये असला तरी मागील सामन्यात तळाच्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे.