How RCB Can Qualify to IPL 2024 Playoffs: यंदाच्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची स्थिती सध्या बिकट झाली आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघाला आठ सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये पराभवाला सामोर जावे लागले आहे. रविवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने आरसीबीचा अवघ्या एका धावेने पराभव केला. यामुळे, आरसीबी आयपीएल २०२४ च्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर कायम राहिली आहे. आरसीबीने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत आठ सामने खेळे अशून त्यातील एक्त एकच सामना जिंकला आहे. त्यामुळे फक्त २ गुण संघाचे आहेत आणि त्यांचा नेट रन रेट (NRR) -१.०४६ आहे. केकेआर विरूद्धच्या पराभवानंतरची संघाची स्थिती पाहता प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला असला तरी संघ अजूनही प्लेऑफमध्ये जाऊ शकतो.
आयपीएल २०२४ मध्ये आरसीबीचे अजून ६ सामने बाकी आहेत आणि या सहाही विजयांसह त्यांचे १४ गुण होतील. आयपीएलच्या प्लेऑफ टप्प्यात पोहोचण्यासाठी संघांना १६ गुणांची आवश्यकता असते. तरीही १४ गुणांसह संघ या फेरीत जाऊ शकतात. परंतु यासाठी आरसीबीला आता इतर संघांवरही अवलंबून राहावे लागेल. त्यातही सर्वात महत्त्वीची बाब म्हणजे उर्वरित सहा सामने आरसीबीला जिंकणे गरजचे आहे आणि सोबतच नेट रन रेटवरचाही विचार करावा लागणार आहे.
आयपीएल २०१८ ते २०२१ मध्ये, प्लेऑफमध्ये जाण्यासाठी संघांना १४ गुणांची आवश्यकता होती. २०१९ मध्ये, सनरायझर्स हैदराबाद फक्त १२ गुणांसह प्लेऑफसाठी पात्र ठरला. २०२२ पासून जेव्हा दोन नवीन संघ या लीगमध्ये सहभागी झाले, तेव्हापासून प्लेऑफकरता पात्र ठरण्यासाठी १६ गुणांची आवश्यकता असते.
फिल सॉल्ट आणि श्रेयस अय्यरच्या चांगल्या खेळीमुळे केकेआरने ६ बाद २२६ धावा केल्या. तर आरसीबीच्या शऱ्थीच्या प्रयत्नांनंतरही अवघ्या एका धावेने त्यांना पराभव पत्करावा लागला. आरसीबीकडून विल जॅक्स आणि रजत पाटीदार या दोघांनीही शानदार अर्धशतकी खेळी केली.पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरले. अखेरच्या चेंडूवर फर्ग्युसन धावबाद झाल्याने आरसीबीचा संघ ऑल आऊट झाला.