IPL 2025 CSK vs GT Highlights: चेन्नई सुपर किंग्सने यंदाच्या सीझनची विजयासह सांगता केली आहे. चेन्नईने गुजरात टायटन्सचा ८३ धावांनी मोठा पराभव करत त्यांच्या प्लेऑफमधील टॉप-२ मध्ये राहण्याच्या आशांना धक्का दिला आहे. गुजरातचा संघ आता पहिल्या स्थानी किंवा टॉप-२ मध्ये राहणं कठिण झालं आहे. याशिवाय चेन्नईचा कर्णधार म्हणून एमएस धोनीचा अखेरचा सामना होता. चेन्नईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २३० धावा केल्या. तर प्रत्युत्तरात गुजरातचा संघ केवळ १४७ धावांत सर्वबाद झाला.

Live Updates
19:08 (IST) 25 May 2025

CSK vs GT live: चेन्नईचा दणदणीत विजय

१९व्या षटकात अंशुल कंबोजच्या तिसऱ्या चेंडूवर धोनीने झेल टिपत साई किशोरला झेलबाद केलं अन् चेन्नईने ८३ धावांनी गुजरातवर मोठा विजय नोंदवला. चेन्नईचा कर्णधार म्हणून धोनीचा हा अखेरचा सामना होता. यासह गुजरातला प्लेऑफसाठी टॉप-२ मध्ये राहण्याच्या आशांना धक्का बसला आहे.

19:00 (IST) 25 May 2025

CSK vs GT live: अरशद खान क्लीन बोल्ड

१८व्या षटकात नूर अहमदने शानदार फटकेबाजी करत असलेल्या अरशद खानला क्लीन बोल्ड केलं. अरशद १४ चेंडूत ३ षटकारांसह २० धावा करत बाद झाला.

18:52 (IST) 25 May 2025

CSK vs GT live: गुजरातने गमावली आठवी विकेट

१६व्या षटकात नूर अहमदने राहुल तेवतियाला झेलबाद करत गुजरातला आठवा धक्का दिला आहे. यासह १६ षटकांत गुजरातने ८ विकेट्स गमावत १२६ धावा केल्या आहेत.

18:46 (IST) 25 May 2025

CSK vs GT live: दोन षटकात दोन विकेट

१३व्या षटकात नूर अहमदने राशीद खानला झेलबाद करत संघाला सहावी विकेट मिळवून दिली. तर पुढच्याच षटकात १४व्या षटकात पथिरानाने कुत्सियाला क्लीन बोल्ड करत गुजरातला सातवा धक्का दिला. यासह आता १५ षटकांत गुजरातने ७ विकेट्स गमावत १२५ धावा केल्या आहेत. तर गुजरातला विजयासाठी ३० चेंडूत १०६ धावांची गरज आहे.

18:26 (IST) 25 May 2025

CSK vs GT live: एका षटकात २ विकेट

११ वे षटक टाकण्यासाठी रवींद्र जडेजाला पाचारण करण्यात आले आणि जड्डूने येताच आपल्या फिरकीची जादू दाखवली. जडेजाने पहिल्याच चेंडूवर शाहरूख खानला पथिरानाकरवी झेलबाद केलं. तर चौथ्या चेंडूवर साई सुदर्शनला शिवम दुबेकरवी झेलबाद करवत सामन्याचा चेहरामोहरा बदलला. यासह ११ षटकांत गुजरातने ५ बाद ८६ धावा केल्या आहेत. यासह गुजरातला विजयासाठी ५४ चेंडूत १४५ धावांची गरज आहे.

18:01 (IST) 25 May 2025

CSK vs GT live: पॉवरप्ले

गुजरात टायटन्सने पॉवरप्लेमध्ये ३ विकेट्स गमावत ३५ धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सने पॉवरप्लेमध्ये सर्वात मोठे विकेट्स गमावले आहेत.

18:00 (IST) 25 May 2025

CSK vs GT live: दोन षटकात दोन विकेट

खलील अहमदने तिसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. यानंतर पुढच्याच चौथ्या षटकात अंशुल कंबोजने तिसऱ्या चेंडूवर शेरफन रूदरफोर्डला खातेही न उघडता माघारी परतावं लागलं. यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ३.४ षटकांत तीन विकेट्स गमावले आहेत.

17:56 (IST) 25 May 2025
CSK vs GT live: दुसऱ्या षटकात गिल झेलबाद

शुबमन गिलने दुसऱ्या षटकात अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर षटकार लगावला. तर पुढच्याच षटकात स्लिपमध्ये गिल झेलबाद झाला.

17:18 (IST) 25 May 2025

CSK vs GT live: चेन्नईची यंदाच्या मोसमातील मोठी धावसंख्या

चेन्नई सुपर किंग्सच्या सर्व फलंदाजांनी योगदान देत यंदाच्या मोसमातील सर्वात मोठी धावसंख्या अखेरच्या सामन्यात उभारली आहे. आयुष म्हात्रेने चेन्नईच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचत कॉन्वे आणि डेवाल्ड ब्रेविसने या धावसंख्येला आकार दिला. यासह चेन्नई सुपर किंग्सने ५ विकेट्स गमावत २३० धावांचा डोंगर उभारला. आयुषने १७ चेंडूत ३४ धावांची खेळी केली. तर कॉन्वे आणि ब्रेविसने अर्धशतक झळकावत महत्त्वपूर्ण धावसंख्येची भर घातली. यासह गुजरात टायटन्सला विजयासाठी २३१ धावांचं आव्हान दिलं आहे.

17:10 (IST) 25 May 2025

CSK vs GT live: डेवाल्ड ब्रेविसचं अर्धशतक

डेवाल्ड ब्रेविसने १९व्या षटकात दोन षटकार आणि चौकारासह वादळी फटकेबाजी करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. ब्रेविसने १९ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ५० धावा पूर्ण केल्या तर संघाच्या धावसंख्येत महत्त्वपूर्ण धावांची भर घातली.

17:03 (IST) 25 May 2025

CSK vs GT live: चेन्नईच्या २०० धावा पूर्ण

चेन्नई सुपर किंग्सने यंदाच्या मोसमातील उत्कृष्ट फलंदाजी करत संघाने १७.५ षटकांत २०० धावांचा टप्पा गाठला. संघातील प्रत्येक फलंदाजाने आपलं योगदान दिले आहे.

16:42 (IST) 25 May 2025
CSK vs GT live: अर्धशतक अन् क्लीन बोल्ड

डेव्हॉन कॉन्वेने चांगली फटकेबाजी करत ३४ चेंडूत आपलं अर्धशतक झळकावलं. राशीदच्या १४व्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार लगावत कॉन्वेने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. पण पुढच्याच चेंडूवर राशीदने कॉन्वेला क्लीन बोल्ड केलं. यासह चेन्नईने १४ षटकांत ४ बाद १५८ धावा केल्या आहेत.

16:39 (IST) 25 May 2025

CSK vs GT live:शिवम दुबे झेलबाद

शाहरूख खान १३वे षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने तिसऱ्याच चेंडूवर मोठी विकेट मिळवून दिली. शिवम दुबे गुजरातविरूद्ध सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पण त्याने येताच षटकार लगावत चांगली सुरूवात केली. शाहरूखने शिवम दुबेला १७ धावांवर झेलबाद केलं. यासह चेन्नईने १३ षटकांत ३ बाद १५० धावा केल्या.

16:36 (IST) 25 May 2025

CSK vs GT live: उर्विल पटेल झेलबाद

कॉन्वेबरोबर अर्धशतकी भागीदारीनंतर उर्विल पटेल झेलबाद झाला. दहाव्या षटकातील साई किशोरच्या दुसऱ्या चेंडूवर उर्विल मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. उर्विलने बाद होण्यापूर्वी १९ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३७ धावांची खेळी केली. यासह चेन्नईने १० षटकांत २ बाद ११५ धावा केल्या आहेत.

16:06 (IST) 25 May 2025

CSK vs GT live: पॉवरप्ले

चेन्नई सुपर किंग्सने पॉवरप्लेमध्ये १ बाद ६८ धावा केल्या आहेत. आयुष म्हात्रेच्या वादळी सुरूवातीनंतर उर्विल पटेल आणि कॉन्वेने संघाचा डाव सावरत आहेत.

15:54 (IST) 25 May 2025

CSK vs GT live: आयुष म्हात्रे झेलबाद

चेन्नईचा सलामीवीर आयुष म्हात्रे वादळी सुरूवातीनंतर झेलबाद झाला. चौथे षटक टाकण्यासाठी प्रसिध्द कृष्णाला पाचारण केले आणि त्याने संघाला मोठी विकेट मिळवून दिली. आयुष १७ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ३४ धावा केल्या आहेत.

15:41 (IST) 25 May 2025

CSK vs GT live: आयुष म्हात्रेची फटकेबाजी

आयुष म्हात्रे आणि डेव्हॉन कॉन्वेची जोडी फलंदाजीला आली आहे. आयुष म्हात्रेने एकट्याने २ षटकांत धावा केल्या आहेत. पहिल्या षटकात चौकार लगावत त्याने सकारात्मक सुरूवात केली. तर दुसऱ्या षटकात त्याने अरशद खानच्या गोलंदाजीवर जबरदस्त फटकेबाजी केली. आयुषने दुसऱ्या षटकात ३ षटकार आणि २ चौकार लगावत २८ धावा कुटल्या.

15:09 (IST) 25 May 2025

CSK vs GT live: गुजरात टायटन्सची प्लेईंग इलेव्हन

शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, जेराल्ड कोएत्झी, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, अर्शद खान, प्रसीध कृष्णा

साई सुदर्शन इम्पॅक्ट प्लेअरच्या यादीत आहे.

15:07 (IST) 25 May 2025

CSK vs GT live: चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग इलेव्हन

आयुष म्हात्रे, डेव्हॉन कॉनवे, उर्विल पटेल, रवींद्र जडेजा, देवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, दीपक हुडा, एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), नूर अहमद, अंशुल कंबोज, खलील अहमद

15:03 (IST) 25 May 2025
CSK vs GT live: नाणेफेक

चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स सामन्याची नाणेफेक चेन्नईने जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघांच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये मोठा बदल झाला आहे. चेन्नच्या ताफ्यात अश्विनच्या जागी दीपक हुडा खेळताना दिसणार आहे. तर गुजरातच्या खात्यात कगिसो रबाडाच्या जागी गेराल्ड कुत्सिया खेळताना दिसेल.