IPL 2025 Mega Auction Updates : आयपीएल २०२५ चा महालिलाव अत्यंत रोमांचक असेल आणि यात शंका नाही. यावेळी पुन्हा एकदा सर्व १० फ्रँचायझी आपापल्या संघांची नव्याने बांघणी करतील आणि खेळाडूंसाठी जोरदार बोली लावली जाईल. प्रत्येक फ्रँचायझीने आयपीएल २०२५ साठी काही खेळाडू कायम ठेवले असले तरी, प्रत्येक संघांतील खेळाडूंची संख्या एकूण २५ करायची आहे. खेळाडूंची ही संख्या पूर्ण करण्यासाठी सर्व संघ लिलावात जोरदार प्रयत्न करताना दिसतील. या लिलावात १० पैकी पाच संघ आपल्या संघासाठी कर्णधार शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

कोणते पाच संघ नव्या कर्णधारांच्या शोधात?

या आयपीएल महालिलावात सहभागी होणाऱ्या १० संघांपैकी ५ संघांकडून कर्णधार नाही. यावेळी ज्या संघांकडे कर्णधार नाही त्यात दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांचा समावेश आहे. दिल्लीने कर्णधार ऋषभ पंतला कायम ठेवले नाही, तर कोलकाताने कर्णधार श्रेयस अय्यरला कायम ठेवले नाही, ज्याने आयपीएल २०२४ मध्ये संघाला जेतेपद पटकावून दिले होते. याशिवाय आरसीबीने फाफ डुप्लेसिसला, लखनौने केएल राहुलला आणि पंजाब किंग्जने शिखर धवनला सोडले होते. आता हे पाच संघ कर्णधाराच्या शोधात आहेत आणि त्यासाठी या सर्वांमध्ये जबरदस्त टक्कर पाहिला मिळण्याची शक्यता आहे.

आयपीएल २०२५ साठी, ज्या संघांकडे कर्णधार नाही, त्यांच्याकडे लिलालावात पर्यायांची कमतरता नाही. त्यामुळे नेतृत्त्व करण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंवर या महालिलावात मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. अशा खेळाडूंमध्ये ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुल, जोस बटलर, एडन मार्करम, डेव्हिड वॉर्नर या खेळाडूंचा समावेश आहे. यापैकी पंतने दिल्लीचे नेतृत्व केले आहे, तर श्रेयसने केकेआरला चॅम्पियन बनवले आहे. केएल राहुल लखनौचा कर्णधार आहे, तर जोस बटलर इंग्लंडच्या वनडे आणि टी-२० संघाचा कर्णधार आहे. याशिवाय एडन मार्करमने हैदराबादचे कर्णधारपद भूषवले आहे, तर डेव्हिड वॉर्नरने त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबादला जेतेपद पटकावून दिले आहे.

हेही वाचा – IND vs AUS : बुमराह-कमिन्स जोडीने पर्थ कसोटीत केला खास विक्रम! कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सहाव्यांदा असं घडलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएल २०२५ साठी पाच संघांचे कर्णधार :

चेन्नई सुपर किंग्ज- ऋतुराज गायकवाड<br>मुंबई इंडियन्स- हार्दिक पंड्या
सनरायझर्स हैदराबाद- पॅट कमिन्स
गुजरात टायटन्स- शुबमन गिल
राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन