Playoff Equation for KKR: कोलकाताला गुरुवारी (११ मे) आयपीएल २०२३ च्या ५६ व्या सामन्यात राजस्थानकडून नऊ गडी राखून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात कोलकाताने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १४९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थान रॉयल्सने युजवेंद्र चहल, यशस्वी जैस्वाल आणि संजू सॅमसनच्या जोरावर १३.१ षटकांत लक्ष्य गाठले.

या विजयामुळे राजस्थानला उत्तम नेट रन रेटच्या जोरावर गुणतालिकेत क्रमांक ३ वर पोहोचण्यास मदत झाली, परंतु त्याच वेळी, प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या केकेआरच्या च्या आशाही धुळीला मिळाल्या. नितीश राणाच्या नेतृत्वाखालील संघ आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेत सातव्या क्रमांकावर गेला आहे. त्यांचे १२ सामन्यांतून १० गुण झाले आहेत. पण अजूनही ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेली नाही. शाहरुख खानच्या मालकीच्या फ्रँचायझीला बाद फेरीसाठी पात्र ठरण्याची संधी आहे, परंतु त्यासाठी त्यांना चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धचे त्यांचे उर्वरित दोन सामने जिंकावे लागतील. त्याचबरोबर इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल.

Confusion on Virat's wicket in , KKR vs RCB match
KKR vs RCB : आऊट की नॉट आउट? अंपायरच्या निर्णयावर विराट कोहली दिसला नाराज, जाणून घ्या काय आहे नियम?
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Virat Kohli's video goes viral
IPL 2024: गौतम गंभीरच्या गळाभेटीवर विराटने सोडले मौन; चाहत्यांना म्हणाला, ‘तुमचा मसाला संपला म्हणून तुम्ही…’, पाहा VIDEO
Rahul Gandhi Helicopter
हेलिकॉप्टरचे इंधन संपल्यामुळे राहुल गांधींवर शहडोलमध्येच रात्र काढण्याची वेळ, प्रशासनाची धावपळ

केकेआर प्लेऑफमध्ये कसे पोहोचू शकते?

केकेआरने पुढील दोन सामने जिंकले तर त्यांचे एकूण १४ गुण होतील, जे एलिमिनेटर सामन्यात स्थान मिळवण्यासाठी पुरेसे ठरू शकेल. पण त्यांचे नेट रन रेट सुधारण्यासाठी त्यांना मोठ्या फरकाने जिंकावे लागेल, जे सध्या -०.३५७ वर आहे. जेणेकरून १४ साखळी सामन्यांच्या शेवटी त्यांचे नेट रन रेट स्पर्धेतील इतर संघांपेक्षा जास्त असेल.

हेही वाचा – RR vs KKR: यशस्वी जैस्वालची वादळी खेळी पाहून विराट कोहलीही झाला आश्चर्यचकित; म्हणाला, “मी पाहिलेली ही सर्वोत्तम…”

केकेआरला स्पर्धेत टिकून राहणण्यासाठी खालीप्रमाणे सर्व सामने व्हावे लागतील –

१२ मे – मुंबई विरुद्ध गुजरात – गुजरात विजयी
१३ मे – हैदराबाद विरुद्ध लखनऊ – हैदराबाद विजयी
१३ मे – दिल्ली विरुद्ध पंजाब – दिल्ली विजयी
१४ मे – राजस्थान विरुद्ध बंगळुरु – बंगळुरु विजयी
१४ मे – चेन्नई विरुद्ध कोलकाता – कोलकाता नाईट विजयी
१५ मे – गुजरात विरुद्ध हैदराबाद – गुजरात विजयी
१६ मे – लखनऊ विरुद्ध मुंबई – लखनऊ विजयी
१७ मे – पंजाब विरुद्ध दिल्ली – दिल्ली विजयी
१८ मे – हैदराबाद विरुद्ध बंगळुरु – हैदराबाद विजयी
१९ मे – पंजाब विरुद्ध राजस्थान – पंजाब विजयी
२० मे – दिल्ली विरुद्ध चेन्नई – चेन्नई विजयी
२० मे – कोलकाता विरुद्ध लखनऊ – कोलकाता विजयी
२१ मे – मुंबई विरुद्ध हैदराबाद – मुंबई विजयी
२२ मे – बंगळुरु विरुद्ध गुजरात – गुजरात विजयी

परंतु उर्वरित १४ सामन्यांचे निकाल वरीलप्रमाणे लागले, तर केकेआरला फायदा होईल. ज्यामध्ये लीग टप्प्यातील सामन्यांच्या शेवटी, गुजरात आणि चेन्नई अनुक्रमे २२ आणि १७ गुणांसह पहिल्या दोनमध्ये राहतील तर कोलकात्याला फायदा होईल. तसेच उर्वरित संघ मुंबई (१४), लखनऊ (१३), राजस्थान (१२), बंगळुरु (१२), पंजाब (१२), हैदराबाद (१२) आणि दिल्ली (१२) यांचे गुण आहेत. केकेआर एकूण १४ पर्यंत पोहोचतील आणि अशा स्थितीत ते प्लेऑफमध्ये स्थान मिळवतील आणि २४ मे रोजी चेन्नई येथे होणार्‍या एलिमिनेटर सामन्यात खेळतील.

हेही वाचा – KKR vs RR Match Updates: ईडन गार्डनमध्ये यशस्वी जैस्वालचे वादळ! राजस्थान रॉयल्सने कोलकाताचा तब्बल नऊ गडी राखून उडवला धुव्वा

कारण लीग टप्प्यातील बाकीचे सर्व सामने गुजरात आणि चेन्नईने गमावले, तरी कोलकाता त्यांच्या गुणांशी बरोबरी करु शकत नाही. शुक्रवारी रात्री मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा पराभव केल्यास हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ आयपीएल २०२३ च्या प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ बनेल.