MI vs PBKS Highlights: आयपीएल २०२३ च्या ३१व्या सामन्यात पंजाब किंग्जच्या संघाने मुंबई इंडियन्सचा १३ धावांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब संघाने ८ गडी गमावून २१४ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना मुंबई संघ ६ गडी गमावून केवळ २०१ धावाच करू शकला. पंजाबच्या विजयाचा हिरो ठरला अर्शदीप सिंग. या सामन्यात अर्शदीपने ४ बळी घेतले. पण अर्शदीपची उत्कृष्ट गोलंदाजी बीसीसीआयला महागात पडली.

अर्शदीपने स्टंप तोडले

मुंबई इंडियन्सला शेवटच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज होती. त्यानंतर पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने अर्शदीप सिंगकडे चेंडू सोपवला. शेवटच्या षटकात त्याने शानदार गोलंदाजी केली. टीम डेव्हिडने पहिल्याच चेंडूवर एकच धाव घेतली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने एकही धाव दिली नाही, तो डॉट पडला. मग त्याने तिसऱ्या चेंडूवर तिलक वर्माला क्लीन बोल्ड केले आणि यावेळी त्याच्या चेंडूचा वेग इतका होता की मधला स्टंपही तोडला. षटकातील चौथ्या चेंडूवर नेहल वढेराला क्लीन बोल्ड केले आणि पुन्हा स्टंप दोन भाग होऊन ते दूरवर फेकले गेले. अर्शदीप सिंगची गती इतकी होती की त्यामुळे स्टंपचे मोठे नुकसान झाले.

बीसीसीआयचे नुकसान

अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात १६ धावा वाचवत पंजाब संघाचा डाव सावरला, मात्र बीसीसीआयचे सुमारे २० लाखांचे नुकसान झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एलईडी स्टंप आणि जिंगल बेल्सच्या सेटची किंमत सुमारे ४०,००० डॉलर्स म्हणजेच सुमारे ३० लाख रुपये आहे. अर्शदीपने सलग दोनदा स्टंप तुटले, अशा स्थितीत बीसीसीआयचे लाखोंचे नुकसान होणार आहे.

पंजाबने रोमांचक सामना जिंकला

पंजाबकडून हरप्रीत सिंग भाटियाने २८ चेंडूत ४१ तर कर्णधार सॅम करनने २९ चेंडूत ५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचा संघ २० षटकांत ६ गडी गमावून २०१ धावाच करू शकला. कॅमेरून ग्रीनने ४३ चेंडूत ६७ धावा, सूर्यकुमार यादवने २६ चेंडूत ५७ धावा आणि कर्णधार रोहित शर्माने २७ चेंडूत ४४ धावा केल्या.

हेही वाचा: IPL सामन्यातल्या LED स्टंप्सची किंमत काय असते? अर्शदीपने दोनदा स्टंप्स तोडल्याने अख्ख्या जगाला पडला प्रश्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाब किंग्जने मुंबई संघाला विजयासाठी २१५ धावांचे लक्ष्य दिले होते. मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली नाही. जेव्हा सलामीवीर इशान किशन अवघी एक धाव काढून बाद झाला. यानंतर रोहित शर्मा आणि कॅमेरून ग्रीन यांनी अप्रतिम खेळी खेळली. जेव्हा हे दोन्ही फलंदाज खेळत होते. त्यानंतर मुंबईचा विजय निश्चित वाटत होता, मात्र रोहित ४४ धावा करून बाद झाला. ग्रीनने ६७ धावांचे योगदान दिले. रोहित बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने धावा काढण्याची जबाबदारी स्वीकारली. त्याने काही आकर्षक फटके खेळले. सूर्याने २६ चेंडूत ७ चौकार आणि ३ लांब षटकारांसह ५७ धावा केल्या. टीम डेव्हिडने १३ चेंडूत २५ धावा केल्या, पण तो मुंबई इंडियन्सला जिंकू शकला नाही.