scorecardresearch

RCB vs MI: चिन्नास्वामी स्टेडियममध्ये मुंबई इंडियन्स-रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने-सामने; ‘अशी’ असेल दोन्ही संघांची प्लेईंग XI

IPL 2023 Royal Challengers Banglore vs Mumbai Indians : आयपीएलचे सामने रंगतदार होत असून आजचा मुंबई विरुद्ध बंगळुरुचा सामना पाहण्याची क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

IPL 2023 RCB vs MI Playing XI
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर वि मुंबई इंडियन्स अपडेट्स

IPL 2023, RCB vs MI Playing XI: आयपीएलमध्ये पाचवेळा विजेतेपदावर शिक्कामोर्तब करणारी मुंबई इंडियन्सची पटलण यंदाच्या आयपीएलच्या १६ व्या हंगामासाठीही सज्ज झाली आहे. ३१ मार्चपासून आयपीएलचे सामने रंगतदार होत असून आजचा मुंबई विरुद्ध बंगळुरुचा सामना पाहण्याची क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मुंबई विरोधात झालेल्या सामन्यांमध्ये बंगळुरुने नेहमीच बाजी मारली आहे, परंतु, चेन्नईत होणाऱ्या आजच्या सामन्यात मुंबई विजयी सलामी देणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आयपीएलच्या मागील हंगामात मुंबई इंडियन्सवर पराभवाचं सावट पसरलं होतं. कारण संघांच्या क्रमवारीत मुंबई १० व्या स्थानावर होती. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईची विजयी घौडदौड बंगळुरुविरुद्ध होणाऱ्या सामन्यापासून पाहायला मिळणार का? हे पाहावं लागणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग २०२३ चे आज दोन सामने खेळवले जात आहेत. पहिला सामना सनरायजर्स हैद्राबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात होत असून दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात होणार आहे. मुंबई इंडियन्सचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. तर आरसीबीच्या कर्णधारपदाची धुरा फाफ डुप्लेसिसकडे असणार आहे. तर जाणून घेऊयात दोन्ही संघांची प्लेईंग ११ विषयी सविस्तर माहिती.

नक्की वाचा – Video: शेवटच्या चेंडूवर ‘इम्पॅक्ट प्लेयर’ गौतमला खेळवला अन् दिल्लीची अवस्था झाली ‘गंभीर’; गड्यानं थेट षटकारच ठोकला

सामना- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स, आयपीएल २०२३, पाचवा सामना

दिवस – २ एप्रिल (रविवार), सायंकाळी ७ वाजता

ठिकाण – एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु

दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग XI

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : फाफ डु प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, महिपाल लोमरोर, मायकल ब्रेसवेल, दिनेश कार्तिक, शाहबाज़ अहमद, डेविड विली, आकाश दीप, सिराज, रीस टॉपले

मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, कॅमरुन ग्रीन, टिम डेविड, ऋतिक शौकीन, जोफ्रा आर्चर, कुमार कार्तिकेय, अरशद खान, जेसन बेहरेनडॉर्फ

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 16:12 IST

संबंधित बातम्या