Rajasthan Royals vs Delhi Capitals Match Updates : राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात आयपीएल २०२४ मधील नववा सामना खेळला जात आहे. दोन्ही संघ जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आमनेसामने आहेत. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजी करताना खराब सुरुवातीनंतर रियान परागच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारता आली. राजस्थान संघाने २० षटकांत ५ गडी गमावून १८५ धावा करताना दिल्लीसमोर १८६ धावांचे लक्ष्य ठेवले.

राजस्थान रॉयल्सची खराब सुरुवात –

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्स संघाची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसनचा संघ फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसला. अवघ्या नऊ धावांच्या स्कोअरवर संघाला पहिला धक्का बसला. यशस्वी जैस्वाल केवळ पाच धावा करू शकला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला. दिल्लीविरुद्ध राजस्थानने २६ धावांवर तीन विकेट गमावल्या. संघाला दुसरा धक्का जोस बटलरच्या रूपाने बसला तो केवळ ११ धावा करू शकला, तर संजू सॅमसन १५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

Rajasthan Royals Big Announcement
IPL 2024 : राजस्थान रॉयल्सची मोठी घोषणा! प्रसिध कृष्णाच्या जागी लखनऊ फ्रँचायझीच्या ‘या’खेळाडूला केले करारबद्ध
IPL 2024 Lucknow Super Giants vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: सर्वात वेगवान चेंडू टाकणारा मयंक यादव आहे तरी कोण?
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
mahendra singh dhoni
IPL 2024 DC vs CSK: खलीलने रचिला पाया, मुकेशने चढविला कळस, दिल्लीचा चेन्नईवर २० धावांनी विजय

यानंतर रविचंद्रन अश्विन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने रियान परागसोबत चौथ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. अश्विनने या सामन्यात १९ चेंडूंचा सामना करत २९ धावा केल्या. यानंतर ध्रुव जुरेलनेही २० धावांची जलद खेळी केली. त्याने १२ चेंडूंचा सामना करत तीन चौकार मारले. शिमरॉन हेटमायर सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने रियान परागसोबत ४३ धावांची नाबाद भागीदारी केली. या सामन्यात हेटमायरने १४ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. त्याचवेळी रियान परागच्या झंझावाती खेळीमुळे राजस्थानची धावसंख्या १८० च्या पुढे गेली.

रियान परागची आयपीएलमधील सर्वोच्च खेळी –

रियान परागने ४५ चेंडूंचा सामना करत सात चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावा केल्या. आतापर्यंतच्या आयपीएलमधील रियान परागची सर्वोच्च खेळी आहे. त्याने शेवटच्या षटकात त्याने एनरिच नॉर्खियाला लक्ष्य केले आणि २५ धावा केल्या. दिल्लीकडून खलील अहमद, मुकेश कुमार, एनरिच नॉर्खिया, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.