आयपीलच्या पंधराव्या हंगामाचे अर्धे सामने संपले आहेत. काही संघांनी आतापर्यंत धडाकेबाज कामगिरी केली आहे. तर मुंबई आणि चेन्नईसारखे दिग्गज संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी आहेत. आयपीएलच्या पहिल्याच हंगामात ट्रॉफीवर नाव कोरणारा राजस्थान रॉयल्स हा संघ तर यावेळी गुणतालिकेत अग्रस्थानी आहे. हा संघ विजयासाठीचा प्रमुख दावेदार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या संघाने ऑस्ट्रेलियचा महान दिवंगत क्रिकेटर शेन वॉर्नला श्रद्धांजली अर्पण करण्याचे ठरवले आहे. येत्या ३० एप्रिल रोजीच्या सामन्यादरम्यान राजस्थान संघ वॉर्नला आदरांजली अर्पण करेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> भारताला विश्वचषक मिळवून देणारे गॅरी कस्टर्न आता इंग्लंडला देणार धडे, प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्याची शक्यता

शेन वॉर्नने आयपीएलच्या पहिल्याच हंगामात म्हणजेच २००८ साली राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व केले होते. विशेष म्हणजे या पहिल्याच हंगामात राजस्थानने ट्रॉफीवर नाव कोरले होते. शेन वॉर्नने राजस्थानचा कर्णधार म्हणून महत्त्वाची भूमिका बजवली होती. मात्र शेन वॉर्नचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तो ५२ वर्षांचा होता.

हेही वाचा >> IPLच्या लिलावादरम्यान माझ्यासोबत फसवणूक आणि विश्वासघात झाला; हर्षल पटेलने सांगितली दुःखद आठवण

वॉर्नने १४५ कसोटी सामन्यांमध्ये ७०८ विकेट्स घेतलेल्या आहेत. तर १९४ एकदिवसीय सामन्यांत वॉर्नच्या नावावर २९३ विकेट्स आहेत. क्रिकेटसाठीच्या त्याच्या याच योगदानामुळे ३० एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स शेन वॉर्नला श्रद्धांजली अर्पण करणार आहे. या दिवशी राजस्थानचा सामना मुंबई इंडियन्सविरोधात पुण्यातील डी वाय पाटील स्पोर्ट अकॅडमी स्टेडियमवर होणार आहे.

हेही वाचा >> आगामी टी-२० मालिकेत विराट कोहलीला डच्चू? खराब कामगिरीमुळे BCCIच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली चिंता

मिळालेल्या माहितीनुसार या दिवशी सामन्यादरम्यान राजस्थान रॉयल्सचे खेळाडू त्यांच्या जर्सीच्या कॉलरवर ‘SW23’ ही अक्षरं लावून मैदानात उतरणार आहेत. शेन वॉर्नसाठी ही विशेष श्रद्धांजली असेल. तसेच डी वाय स्टेडियमवर एक विशेष गॅलरी तयार करण्यात आली आहे. सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना या गॅलरीला भेट देता येणार आहे. विशेष म्हणजे शेन वॉर्नचा भाऊ जेसन वॉर्नदेखील या सामन्याला हजेरी लावणार असून त्याने आमंत्रण स्वीकारलेले आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajasthan royals will pay tribute to shane warne in rr vs mi ipl 2022 match prd
First published on: 27-04-2022 at 20:44 IST