IPL 2025 Rohit Sharma Mumbai Indians Dressing Room Video: आयपीएल २०२५ मध्ये दुसऱ्या क्वालिफायर सामन्यातील पराभवामुळे मुंबई इंडियन्सचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पंजाब किंग्जने क्वालिफायर २ मध्ये मुंबई इंडियन्सचा ५ विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. आज म्हणजेच ३ जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स यांच्यात अंतिम सामना खेळवला जाणार आहे. यादरम्यान मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममधील रोहित शर्माचा एक व्हीडिओ समोर येत आहे.

दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २०३ धावांचा डोंगर उभारला, परंतु पंजाबने एक षटक शिल्लक असताना लक्ष्य गाठले. पाच वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सला अंतिम फेरीत पोहोचता आले नाही. यापूर्वी, मुंबईने एलिमिनेटरमध्ये गुजरात टायटन्सचा पराभव करून दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले होते.

मुंबई-पंजाब सामन्यानंतर सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचे खेळाडू एकमेकांची भेट घेत सर्व खेळाडूंचे ऑटोग्राफ घेताना दिसले. यादरम्यान संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माकडून ऑटोग्राफ घेताना सर्व खेळाडू दिसत आहेत. यादरम्यान रोहितकडून त्याची बॅट घेत त्याच्यावर रोहितचा ऑटोग्राफही घेत आहेत दरम्यान फिरकी गोलंदाज कर्ण शर्मानेही गंमतीने रोहितकडे बॅट मागितली.

कर्ण शर्मापूर्वी रॉबिन मिंज, कृष्णन श्रीजीत, जॉनी बेयरस्टो आणि बेव्हॉन जेकब्स यांनी रोहितकडू बॅट घेतल्या. रोहितकडे कर्ण शर्माने बॅट मागताच रोहित लगेच म्हणाला, अरे यार माझ्याकडे आता बॅटच उरली नाहीये. सर्व खेळाडूंनी माझ्या सहा बॅट घेतल्या, माझी बॅग पण रिकामी आहे. रोहितने त्याची किट बॅगही दाखवली ज्यात फक्त दोन बॅट उरल्या होत्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएल २०२५ मध्ये, रोहित शर्माने १५ सामन्यांमध्ये ४१८ धावा केल्या. त्याची सर्वाेत्तम धावसंख्या ८१ धावा होती, ही मोठी खेळी रोहितने गुजरात टायटन्स विरुद्धच्या एलिमिनेटरमध्ये खेळली होती. या हंगामात त्याची सरासरी २९.८६ आणि स्ट्राईक रेट १४९.२९ होता. रोहितने या हंगामात चार अर्धशतकं झळकावली आणि आयपीएलमध्ये त्याने ७ हजार धावांचा आकडाही गाठला. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये त्याचा फॉर्म खराब होता, परंतु नंतर त्याने शानदार पुनरागमन केले.