IPL 2025 RR vs MI Highlights: आयपीएल २०२५ स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आधी मुंबईच्या गोलंदाजांनी कहर केला. त्यानंतर गोलंदाजांनी राजस्थानच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडलं. हा सामना मुंबईने १०० धावांनी आपल्या नावावर केला. यासह गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं आहे.

Live Updates
23:17 (IST) 1 May 2025

RR vs MI Live: मुंबईचा विजयी षटकार! १३ वर्षांनंतर पिंक सिटीत विजयाचा गुलाल उधळला; राजस्थानचं स्पर्धेतून पॅकअप

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडलं. हा सामना मुंबईने १०० धावांनी आपल्या नावावर केला आहे.

22:52 (IST) 1 May 2025
RR vs MI Live: कर्ण शर्माची जादू!

मुंबईच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली सुरूवात करून दिल्यानंतर आता फिरकी गोलंदाजांनी मुंबईला विजयाच्या आणखी जळव पोहोचवलं आहे. कर्ण शर्माने ३ विकेट्स घेतल्या आहेत. यासह मुंबईला विजयासाठी केवळ १ विकेटची गरज आहे.

22:49 (IST) 1 May 2025

RR vs MI: फलंदाजांनंतर गोलंदाजही चमकले! राजस्थानचे ८ फलंदाज तंबूत

राजस्थान रॉयल्सला आठवा धक्का बसला आहे.

22:33 (IST) 1 May 2025

RR vs MI Live: राजस्थानचे ७ फलंदाज तंबूत

राजस्थान रॉयल्सला ७ धक्के बसले आहेत. ध्रुव जुरेल अवघ्या ११ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.

22:29 (IST) 1 May 2025

RR vs MI Live : मुंबईच्या विजयाच्या दिशेने वाटचाल, राजस्थानचे ६ फलंदाज तंबूत

धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान रॉयल्सला एकापाठोपाठ एक ६ धक्के बसले आहेत. पावरप्लेच्या षटकांमध्ये मुंबईच्या गोलंदाजांची जादू पाहायला मिळाली आहे.

21:59 (IST) 1 May 2025
RR vs MI Live: राजस्थानला लागोपाठ ३ धक्के

राजस्थान रॉयल्सला हवी तशी सुरूवात करता आलेली नाही. वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल नंतर आता नितीश राणाही बाद होऊन माघारी परतला आहे.

21:21 (IST) 1 May 2025

RR vs MI Live: मुंबईने उभारला २१७ धावांचा डोंगर

या सामन्यात फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनने संघाला दमदार सुरूवात करून दिली. शेवटी हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादवने नाबाद ४८-४८ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २१७ धावांवर पोहोचवली आहे.

20:38 (IST) 1 May 2025

RR vs MI Live: मुंबईचे दोन्ही सलामीवीर तंबूत

मुंबई इंडियन्सला दुसरा मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख फलंदाज रोहित शर्मा बाद होऊन माघारी परतला आहे. रोहितनेही शानदार सुरूवात करून देत अर्धशतकी खेळी केली.

20:34 (IST) 1 May 2025

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सला पहिला धक्का

मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला आहे. आक्रमक सलामीवीर फलंदाज रायन रिकल्टन बाद होऊन माघारी परतला आहे.

20:31 (IST) 1 May 2025

RR vs MI Live: रोहितचं अर्धशतक पूर्ण

रोहित शर्माने रायन रिकल्टनसोबत मिळून शतकी भागीदारी पूर्ण केली. आता ३१ चेंडूंचा सामना करत त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

20:28 (IST) 1 May 2025

RR vs MI Live: मुंबईचं शतक पूर्ण

रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनची जोडी चांगलीच जमली आहे. मुंबईने ११ व्या षटकत १०० धावा पूर्ण केल्या आहेत.

20:19 (IST) 1 May 2025

RR vs MI Live: रायन रिकल्टनचं अर्धशतक पूर्ण

मुंबईकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या रायन रिकल्टनने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. त्याने २९ चेंडूंचा सामना करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

20:07 (IST) 1 May 2025

RR vs MI Live: पावरप्ले

मुंबईने पावरप्लेमध्ये दमदार सुरूवात केली आहे. रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनच्या जोडीने पावरप्लेमध्ये राजस्थानच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. मुंबईने आतापर्यंत ६ षटकांअखेर ५८ धावा केल्या आहेत

19:11 (IST) 1 May 2025
RR vs MI Live: अशी आहे दन्ही संघांची प्लेइंग ११

मुंबई इंडियन्स: रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षणा, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, फजलहक फरूकी.

19:07 (IST) 1 May 2025

RR vs MI Live: राजस्थान रॉयल्सचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय! पाहा दोन्ही संघांची प्लेइंग ११

या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Rohit Sharma Becomes First Batter with Most Sixes for Mumbai Indians Broke Kieron Pollard Record

IPL 2025 RR vs MI LIVE Cricket Highlights