भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ बाबत महत्वाची घोषणा केली आहे. जय शाह चेन्नई सुपर किंग्जने चेन्नई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिनही उपस्थित होते.

बीसीसीआय सचिव जय शहा म्हणाले, “मला माहीत आहे की तुम्हाला चेपॉकमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा खेळ पाहायचा आहे आणि ते लवकरच होणार आहे. आयपीएलचा १५वा हंगाम भारतात होणार असून दोन नवीन संघांची भर पडल्याने तो पूर्वीपेक्षा अधिक रोमांचक असेल.”

गेल्या दोन वर्षांपासून आयपीएलचे आयोजन भारताऐवजी यूएईमध्ये केले जात आहे. गेल्या वर्षी करोना व्हायरसमुळे संपूर्ण स्पर्धा  यूएईमध्ये आयोजित करण्यात आली होती, तर यावर्षी आयपीएलचा २०२१ चा दुसरा टप्पा यूएईमध्ये खेळवण्यात आला. यावर्षी धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जने अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करून चौथे आयपीएल विजेतेपद पटकावले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन नवीन संघाचा समावेश

आयपीएलमधील एकूण संघांची संख्या आता आठ वरून १० झाली आहे. बीसीसीआयने ज्या दोन नवीन संघांचा समावेश केला आहे त्यात लखनौ फ्रँचायझी आणि अहमदाबाद फ्रँचायझी यांचा समावेश आहे. संजीव गोएंका यांच्या मालकीच्या रायझिंग पुणे सुपरजायंट्स ग्रुपने (RPSG) लखनौ फ्रँचायझी ७०९० कोटी रुपयांची बोली लावून जिंकली, तर CVC कॅपिटलने अहमदाबाद फ्रँचायझी मिळवण्यासाठी ५६२५ कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. गोयंका हे दोन वर्षांपासून पुणे फ्रँचायझी रायझिंग पुणे सुपरजायंट्स (RPS) चे मालक आहेत.