आयपीएल २०२५ नंतर कुलदीप यादवच्या साखरपुड्याचा फोटो अचानक समोर आला आहे. कुलदीप यादवने बालपणीची मैत्रिण वंशिका हिच्यासोबत साखरपुडा उरकला आहे. इंग्लंड दौऱ्यापूर्वी कुलदीपने साखरपुडा उरकल्याचा फोटो समोर आला आहे.

भारतीय क्रिकेटचा ‘चायनामन’ म्हणून ओळखला जाणारा भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादव बुधवारी लखनौमध्ये झालेल्या एका खाजगी समारंभात त्याची बालपणीची मैत्रीण वंशिकाशी साखरपुडा केला. या खाजगी कार्यक्रमाला जवळचे कुटुंबीय आणि रिंकू सिंगसह उत्तर प्रदेशातील अनेक क्रिकेटपटू उपस्थित होते.

लखनौमध्ये हा साखरपुडा समारंभ पार पडला, जिथे कुलदीपने वंशिकाला अंगठी घालत त्यांचं नातं ऑफिशियल केलं. वंशिका जी मूळची श्याम नगरची आहे आणि एलआयसीमध्ये काम करते. दोघेही लहानपणापासून एकमेकांना ओळखतात.

इंग्लंड दौऱ्याआधी कुलदीप यादवने साखरपुडा उरकत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. दरम्यान इंग्लंड दौऱ्यासाठी कुलदीप यादवची देखील निवड करण्यात आली आहे. कुलदीप यादव हा टीम इंडियाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज असणार आहे. याचबरोबर नवख्या संघामध्ये कुलदीप यादव हा अनुभवी खेळाडूही असेल.

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुबमन गिल ( कर्णधार) यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत ( यष्टीरक्षक/ उपकर्णधार), केएल राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रविंद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदिप सिंग, आकाश दीप, कुलदीप यादव