Mohammed Shami Injury: २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियासाठी मोहम्मद शमी हा हुकूमी एक्का सिद्ध झाला होता. केवळ सात सामन्यांमध्ये २४ बाद विकेट्स घेऊन त्याने भारतासाठी मोलाची कामगिरी केली. शमीच्या या चमकदार कामगिरीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला मिळालेली ही संधी अत्यंत अचानक पदरी पडली होती. सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये शमीला संधीच मिळाली नव्हती पण हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे शमीचा संघात प्रवेश झाला आणि मग जे झालं ते जगानं पाहिलं आहे. विश्वचषकातील विक्रमी कामगिरीने शमीचे नाव एकदिवसीय स्पर्धेच्या इतिहासात देशातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज म्हणून नोंदवले.

मात्र आता एका अहवालात शमीच्या आरोग्याविषयी अशी माहिती समोर येत आहे ज्यामुळे त्याच्याविषयी वाटणारा आदर आणखीनच वाढेल. क्रिकबझच्या माहितीनुसार, विश्वचषकादरम्यान शमीला घोट्याचा त्रास जाणवत होता. म्हणूनच, विश्वचषकानंतर, शमीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या भारताच्या T20I मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

अलीकडेच, BCCI ने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी ३ वनडे, ३ T20I आणि २ कसोटी सामने खेळण्यासाठी संघांची घोषणा केली. शमीचे नाव लाल-बॉल मालिकेसाठी संघात जोडले असले तरी त्यात एका गोष्टीची भीती आहेच. याबाबत बीसीसीआयने सुद्धा निवेदनात खुलासा करत म्हटले की, “मोहम्मद शमी सध्या वैद्यकीय उपचार घेत असून त्याची उपलब्धता फिटनेसच्या अधीन आहे”.

शमी गेल्या वर्षीच्या विश्वचषकापासूनच भारतीय T20I संघाचा भाग नव्हता, परंतु त्याने इंडियन प्रीमियर लीगच्या २०२३ च्या स्पर्धेत तब्बल २८ विकेट घेतल्याने तो पुन्हा चमकला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा संघ बुधवारी पहाटे बेंगळुरूहून दुबईमार्गे डर्बनला रवाना होणार आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नुकत्याच संपलेल्या T20I मालिकेत ऑस्ट्रेलियावर ४- १ असा विजय नोंदवला होता.

हे ही वाचा<<“विराट कोहलीला मी हटवलं नाही, एवढंच म्हणालो की..” कोहलीच्या कर्णधारपदाच्या वादावर सौरव गांगुलीने सोडलं मौन

या प्रवासात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसह संपूर्ण सपोर्ट स्टाफ असेल. डरबनमधील किंग्समीड येथे १० डिसेंबर रोजी नियोजित पहिल्या T20I सामन्यासह मालिकेची सुरुवात झाली. रोहित शर्मा खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये पुनरागमन करण्यापूर्वी एकदिवसीय सामन्यांमध्ये केएल राहुल संघाचे नेतृत्व करेल.