Mohammed Shami Fitness Update: भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिला सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाला ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर सर्वांनाच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी संघात कधी परतणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. जो एका वर्षाहून अधिक काळ टीम इंडियामध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु अद्याप त्याच्याबद्दल कोणतेही अधिकृत अपडेट समोर आलेले नाही. दरम्यान, मोहम्मद शमीबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

मोहम्मद शमीचा आगामी विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी बंगालच्या २० सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे, कारण तो ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठी आपली तंदुरुस्ती सिद्ध करू पाहत आहे. दुसऱ्या कसोटीनंतर रोहित शर्मा म्हणाला होता की, शमीसाठी ऑस्ट्रेलियात संघात येण्यासाठी दरवाजे पूर्णपणे खुले आहेत, पण शमी पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतरच संघात परतावे अशी त्याची इच्छा आहे. भारत सध्या ब्रिस्बेनमध्ये तिसरी कसोटी खेळत आहे आणि चौथी कसोटी २६ डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये सुरू होणार आहे.

हेही वाचा – IND vs AUS: विराटने ‘नैनोंं में सपना’ गाण्यावर डान्स करत हरभजनची घेतली फिरकी, अचानक डान्स का करू लागला कोहली? पाहा VIDEO

२०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात भारताकडून शेवटचा सामना खेळलेल्या शमीच्या या वर्षी फेब्रुवारीमध्ये घोट्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने पुनरागमन केले आणि मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यात सात विकेट्स घेतल्या. यानंतर, त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालसाठी सर्व ९ सामने खेळले आणि ७.८५ च्या इकॉनॉमीने ११ विकेट घेतले. मात्र, या स्पर्धेदरम्यान त्याच्या गुडघ्याला काही प्रमाणात सूज आली, ज्यामुळे त्याच्या कसोटी क्रिकेटच्या तयारीत अडथळा निर्माण झाला.

हेही वाचा –IND vs AUS: गाबा कसोटीच्या अखेरच्या ४ दिवसांची वेळ बदलली, सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहम्मद शमी व्यतिरिक्त, वेगवान गोलंदाज मुकेश कुमार देखील बंगाल संघाचा एक भाग आहे, ज्याचे नेतृत्व सुदीप कुमार घरमी करणार आहे. संघ २१ डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये दिल्लीविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. सर्व खेळाडू बुधवारी कोलकाताहून हैदराबादला रवाना होतील. विजय हजारे ट्रॉफी २१ डिसेंबर ते १८ जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. या यादी-अ स्वरूपाच्या स्पर्धेत एकूण ३८ संघ सहभागी होणार आहेत.