MPL 2023: एमपीएल २०२३ मध्ये रत्नागिरी जेट्स ट्रॉफी जिंकत आपल्या नावावर केली. सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने घोळ घातल्याने कोल्हापूर टस्कर्सच्या पदरी निराशा पडली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेचा अंतिम सामना ३० जून रोजी शुक्रवारी पार पडला. रत्नागिरी जेट्स आणि कोल्हापूर टस्कर्स यांच्यातील हा सामना वेळापत्रकानुसार गुरुवारी होणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे नाणेफेक देखील न झाल्याने सामना राखीव दिवशी शुक्रवारी खेळला गेला.

सध्या मान्सूनचे दिवस असल्याने पुण्यात काही दिवसांपासून तुफान पाऊस सुरु आहे. शुक्रवारी म्हणजेच आज देखील प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूर फलंदाजी करत असताना वरुण राजाने व्यत्यय आणला. त्यामुळे हा सामना पूर्ण होऊ न शकल्याने रद्द करण्यात आला आणि गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या रत्नागिरी जेट्स संघाला विजयी घोषित करण्यात आले. ह्या निर्णयाने कोल्हापूर टस्कर्सच्या नशिबी मात्र पराभव स्वीकारण्याऐवजी दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता.

तत्पूर्वी, गुरुवारी सामना पूर्ण न झाल्याने हा शुक्रवारी खेळण्याचे निश्चित झाले होते. त्याप्रमाणे पावसाने काही काळ विश्रांती घेताच पुणे येथील गहुंजे स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफने अपार मेहनत घेऊन मैदान आणि खेळपट्टी तयार केली. त्यानंतर रत्नागिरी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. रत्नागिरीचे सलामीवीर प्रदीप धाडे आणि कुणाल थोरात या गोलंदाजांनी कोल्हापूरचे आघाडीचे फलंदाज झटपट तंबूत पाठवले. मागील सामन्यातील चमकदार कामगिरी करणारा अंकित बावणे देखील फारशी काही चांगली खेळी खेळू करू शकला नाही. त्याच्या पाठोपाठ साहिल औताडे, नौशाद शेख व सिद्धार्थ म्हात्रे फक्त मैदानात हजेरी लावून तंबूत परतले. टीम इंडियाचा स्टार फलंदाज आणि पुण्याची शान असणारा कर्णधार केदार जाधव याने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. कोल्हापूर संघाने १६ षटकात ८ बाद ८० धावा केल्यानंतर पावसाने पुन्हा खोडा घातला. त्यानंतर जवळपास तीन तासांचा वेळ वाया गेला.

हेही वाचा: Ajit Agarkar: BCCI लवकरच निवड समिती अध्यक्षांचा वाढवणार पगार! माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकरने भरला आज फॉर्म

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

क्रिकेटच्या नियमानुसार गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या संघाला म्हणजेच गेल्यानंतर रत्नागिरी जेट्सला विजयी घोषित करण्यात आले. विजेत्या रत्नागिरी संघाला ५० लाख रुपये बक्षीस देण्यात आले. दुसरीकडे उपविजेत्या कोल्हापूर संघाला २५ लाख रुपये परितोषिक म्हणून देण्यात आले. ऑरेंज कॅप कोल्हापूरच्या अंकित बावणे याने आपल्या नावे केली. त्याचवेळी पर्पल कॅपचा मानकरी पुणेरी बाप्पा संघाचा सचिन भोसले ठरला.