IND vs AUS 3rd Test Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदोरमध्ये खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायनने भारताविरुद्ध मोठी कामगिरी केली आहे. त्याने भारताच्या दुसऱ्या डावात एकूण ८ फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तसेच नॅथनने दुसऱ्यांदा भारताविरुद्ध आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवली.

भारत पहिल्या डावाच्या आधारे ऑस्ट्रेलियापेक्षा ८८ धावांनी पिछाडीवर पडला होता. त्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावात नॅथन लायनच्या फिरकीच्या जाळ्यात गारद झाला. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या पाहुण्या गोलंदाजाने दुसऱ्यांदा ८ बळी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
इंदोरच्या होळकर स्टेडियमवर भारत विरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात नॅथन लायनने तीन बळी घेतले.

दुसऱ्या डावात त्याने भारताच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याने भारताच्या ८ फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याने ६४ धावांत ८ बळी घेतले. लायनने दुसऱ्यांदा असा पराक्रम केला. याआधी त्याने २०१७ मध्ये बंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात ५० धावांत ८ बळी घेतले होते.

भारतातील पाहुण्या गोलंदाजाची सर्वोत्तम आकडेवारी –

१०/११९ एजाज पटेल, मुंबई २०२१-२२
८/५० नॅथन लायन, बंगळुरु २०१६-१७
८/६४ लान्स क्लुसेनर, कोलकाता १९९६-९७
८/६४ नॅथन लायन, इंदूर २०२२-२३*

भारतीय संघाचा दुसरा डाव ६०.३ षटकांत १६३ धावांवर गडगडला. या डावातील टीम इंडियाच्या आठ फलंदाजांना नॅथन लायनने आपल्या जाळ्यात अडकवले. ज्यामध्ये रोहित शर्मा (१२), शुभमन गिल (५), चेतेश्वर पुजारा (५९), रवींद्र जडेजा (७), श्रीकर भरत (३), अश्विन (१६), उमेश यादव (०) आणि मोहम्मद सिराज (०) या फलंदाजांचा समावेश होता.

हेही वाचा – IND vs AUS 3rd Test: पुजारा-अक्षर पटेलवर भडकला रोहित; ड्रेसिंग रूममधून पाठवला मेसेज, VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑस्ट्रेलियाला ७६ धावांचे लक्ष्य –

यानंतर टीम इंडियाचा दुसरा डाव अवघ्या १६३ धावांवर आटोपला. मोहम्मद सिराज शेवटची विकेटच्या रुपाने म्हणून बाद झाला. त्याने ७ चेंडू खेळले आणि त्याला एकही धाव करता आली नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॅथन लायनने शानदार गोलंदाजी करताना ८ बळी घेतले. ऑस्ट्रेलियाला ७६ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया या लक्ष्याचा पाठलाग करेल.