Hair Stylist Aleem Hakeem Shares MS Dhoni New Hair Style Photos : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने भलेही क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असेल, पण त्याची खास शैली आणि लूक त्याला चर्चेत ठेवतात. आता एक अतिशय लोकप्रिय हेअर स्टायलिस्ट अलीम हकीमने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये माहीने त्याचे लांब केस कापलेले दिसत आहेत. ज्यामुळे धोनीला एक नवीन आणि मस्त लूक मिळाल्याचे दिसत आहे.

काही काळापूर्वी आयपीएल २०२४ मध्ये धोनी लांब केसांच्या लूकमध्ये खेळताना दिसला होता, परंतु आता नवीन हेअरकटमुळे धोनी एखाद्या मॉडेलपेक्षा कमी दिसत नाही. हेअर स्टायलिस्ट अलीम हकीमने धोनीच्या फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, “आमचा तरुण, डायनॅमिक आणि देखणा महेंद्रसिंग धोनी. थालाचे हेअर स्टाईल करणे हा एक आनंददायी अनुभव आहे. धोनी नेहमीच इतका विनम्र असतो की तो मला फोटो काढायला कधीच मनाई करत नाही.”


काही आठवड्यांपूर्वी रांची येथील त्याच्या फार्महाऊसमध्ये आराम करताना दिसला होता. त्यावेळी समोर आलेल्या फोटोंमध्येही धोनीचे केस लांब होते, मात्र आता त्याने केसांची लांबी थोडी कमी केली आहे. कमेंट सेक्शनमध्ये एका चाहत्याने लिहिले की, ‘धोनी काही दिवसात ४३ वर्षांचा होईल यावर विश्वास बसत नाही. खरंतर धोनी अजूनही खूप तरुण दिसतो.’

हेही वाचा – IND vs ENG : आधी संघाला विजयी केले, मग जिंकले रितिकाचे मन, मैदानावर दिसले रोहित शर्माचे नवे रुप, पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमएस धोनी आयपीएल २०२४ मध्ये खेळणार?

आयपीएल २०२४ मध्ये धोनीच्या दमदार कामगिरीनंतर धोनी पुढच्या हंगामात खेळणार की नाही हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असेल. नुकत्याच झालेल्या हंगामात, त्याने सीएसकेचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे सोपवले, जो संघाला प्लेऑफमध्ये नेऊ शकला नाही. आयपीएल २०२४ मध्ये धोनीने २२० च्या स्ट्राईक रेटने खेळताना १६१ धावा केल्या आणि भरपूर षटकार मारून प्रेक्षकांचे मनोरंजनही केले. धोनीने अद्याप निवृत्तीबाबत कोणतीही घोषणा केली नसल्यामुळे धोनी जर तंदुरुस्त राहिला तर तो आयपीएल २०२५ मध्ये नक्कीच खेळताना दिसेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.