आयपीएलचे पंधरावे पर्व शेवटच्या टप्यात आहे. आता भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका, इंग्लड यांच्यासोबतच्या मालिकेचे वेध लागले आहे. तर दुसरीकडे राष्ट्रीय निवड समिती या मालिकांसाठी संघाची निवड करण्यात गुंतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार २२ मे रोजी निवड समितीकडून दक्षिण आफ्रिकेसोबतच्या टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा केली जाऊ शकते. या संघामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> बंगळुरुकडून मुंबईच्या विजयासाठी प्रार्थना, लिहिलं खास पत्र; प्लेऑफचं नेमकं गणित काय?

येत्या ९ जूनपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-२० मालिकेला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय निवड समिती सध्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंना संधी देण्याचा विचार करत आहे. आयपीएलमध्ये चांगला खेळ करणाऱ्या खेळाडूंना या मालिकेत संधी दिली जाऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार वेगवान गोलंदाज उमरान मलिक, मोहसिन खान यांच्यासारख्या खेळाडूंना संघात स्थान दिले जाऊ शकते. तसेच तिलक वर्मा, राहुल तेवतीया, दीपक हुडा यांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे या खेळाडूंनादेखील संघात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे. तसेच फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांचादेखील संघात समावेश केला जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> चेन्नईविरोधात खेळताना चहलने मोडला हरभजन सिंगचा विक्रम, केली ‘ही’ मोठी कामगिरी

तसेच दक्षिण आफ्रिकेसोबतच्या मालिकेसाठी दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, शिखर धवन यांनादेखील संधी दिली जाऊ शकते. तर दुसरीकडे येत्या १५ जून रोजी इंग्लंडविरोधातील मालिकेसाठी भारतीय संघ रवाना होणार आहे. या मालिकेसाठी विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रित बुमराह, ऋषभ पंत यांना विश्रांती दिली जाऊ शकते. या आघाडीच्या खेळाडूंना विश्रांती मिळाली तर शिखर धवन किंवा हार्दिक पांड्या यांच्याकडे नेतृत्वाची धुरा दिला जाऊ शकते.