scorecardresearch

Premium

PAK vs ENG: सेमीफायनलमधून बाहेर पडलेल्या पाकिस्तानसाठी प्रतिष्ठेची लढाई, इंग्लंडने विजयासाठी ठेवले ३३८ धावांचे आव्हान

Pakistan vs England, World Cup 2023: इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने शानदार फलंदाजी करत पाकिस्तानसमोर ३३८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

ENG vs PAK: England gave Pakistan a target of 338 runs Half centuries from Stokes Joe Root and Bairstow
इंग्लंडने शानदार फलंदाजी करत पाकिस्तानसमोर ३३८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सौजन्य- (ट्वीटर)

Pakistan vs England ICC Cricket World Cup 2023 Match Updates: इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आता पाकिस्तानला जवळपास १० षटकांत ३०० धावांचे लक्ष्य पार करावे लागणार असून ते अशक्य आहे. त्यामुळे किमान प्रतिष्ठा जपण्यासाठी तरी हा सामना जिंकणे बाबर आझमसाठी महत्त्वाची बाब झाली आहे. इंग्लंडने दमदार फलंदाजी करत पाकिस्तानसमोर विजयासाठी ३३८ धावांचे मोठे आव्हान ठेवले आहे. दोन्ही संघांच्या चाहत्यांना वाटते की, विश्वचषक २०२३चा शेवट हा गोड व्हावा.

विश्वचषकाच्या ४४व्या सामन्यात पाकिस्तानसमोर इंग्लंडचे आव्हान आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्याचे आठ सामन्यांत चार गुण आहेत. त्याचबरोबर इंग्लंड आठ सामन्यांतून चार गुणांसह सातव्या स्थानावर आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेक हरल्याने पाकिस्तानच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. बाबर आझमने संघात एक बदल केला. हसन अलीच्या जागी शादाब खानला संधी मिळाली आहे. दुसरीकडे, इंग्लंडने एकही बदल केला नाही. इंग्लंडने ५० षटकांत नऊ गडी गमावून ३३७ धावा केल्या. पाकिस्तानला विजयासाठी ३३८ धावा करायच्या आहेत.

England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
Former England captain Michael Atherton Statement
IND vs ENG : जसप्रीत बुमराहसमोर बेन स्टोक्स वारंवार का अपयशी ठरतोय? इंग्लंडच्या माजी कर्णधाराने सांगितले कारण
Shubman Gill's reaction to century against ENG 2nd Test
IND vs ENG : “माझ्या बॅटमधून धावा होत नव्हत्या, तेव्हा…”, इंग्लंडविरुद्धच्या शतकी खेळीनंतर शुबमन गिलची प्रतिक्रिया
Indian team restricted England to 253 runs in the first innings
IND vs ENG : बुमराहसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी टेकले गुडघे, भारताने पहिल्या डावाच्या जोरावर घेतली १४३ धावांची आघाडी

पाकिस्तानसाठी अवघड लक्ष्य

इंग्लंडने पाकिस्तानला विजयासाठी ३३८ धावांचे लक्ष्य दिले आहे. त्यांनी ५० षटकांत नऊ गडी बाद ३३७ धावा केल्या. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने ८४, जो रूटने ६० आणि जॉनी बेअरस्टोने ५९ धावा केल्या. डेव्हिड मलानने ३१, हॅरी ब्रूकने ३० आणि जोस बटलरने २७ धावा केल्या. डेव्हिड विलीने १५ धावांचे योगदान दिले. मोईन अलीला फक्त आठ धावा करता आल्या तर ख्रिस वोक्सला फक्त चार धावा करता आल्या. गस ऍटकिन्सनला खातेही उघडता आले नाही. पाकिस्तानकडून हारिस रौफने तीन विकेट्स घेतले. शाहीन आफ्रिदी आणि मोहम्मद वसीम ज्युनियर यांना प्रत्येकी दोन गडी बाद करण्यात यश मिळाले. इफ्तिखार अहमदने एक विकेट घेत त्यांना मदत केली. पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल तर त्याला हा सामना ३८ चेंडूत जिंकावा लागेल, जे की अशक्य काम आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी इंग्लंड कसे पात्र ठरू शकते?

पाकिस्तानचा पराभव झाल्यास इंग्लंडचे सहा गुण होतील. मग त्यांना बांगलादेश किंवा नेदरलँड्सपैकी एक तरी अंतिम सामना हरेल, यासाठी प्रार्थना करावी लागेल. इंग्लंडचा संघ पाकिस्तानकडून पराभूत झाल्यास त्यांचे केवळ चार गुण राहतील. मग त्यांना आशा करावी लागेल की बांगलादेश किंवा नेदरलँड्सपैकी एक तरी अंतिम सामना हरेल. जर इंग्लंड पाकिस्तानकडून हरले आणि बांगलादेश आणि नेदरलँड्सने त्यांचे अंतिम सामने जिंकले तर इंग्लंड पात्र होऊ शकत नाही. इंग्लंडची निव्वळ धावगती बांगलादेशच्या सध्याच्या निव्वळ रनरेटपेक्षा कमी होऊ नये यासाठी किमान पाकिस्तानकडून सुमारे ४० षटकांआधी पराभूत होऊ नये यासाठी प्रयत्न करावे लागतील.

हेही वाचा: World Cup 2023: “हे सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमण नाही…”, बुमराह-शमी आणि सिराज या त्रिकुटावर सौरव गांगुलीचे मोठे वक्तव्य

दोन्ही संघांची प्लेइंग-११

इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार /यष्टीरक्षक), मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, गस ऍटकिन्सन, आदिल रशीद.

पाकिस्तान: अब्दुल्ला शफीक, फखर जमान, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, आगा सलमान, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम जूनियर, हारिस रौफ.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pak vs eng battle of prestige for semi final exits pakistan england set a 338 run challenge for victory avw

First published on: 11-11-2023 at 18:06 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×