Rajasthan Royals bought Shubham Dubey in 5.80 Crore : इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांच्याव मोठ्या प्रमाणात पैशांचा पाऊस पाडण्यात आला. यासोबतच काही अनकॅप्ड खेळाडूंनाही चांगली रक्कम मिळाली आहे. असाच एक खेळाडू म्हणजे शुभम दुबे. शुभमला राजस्थान रॉयल्सने मूळ किमतीपेक्षा २९ पट अधिक किंमतीत विकत घेतले. शुभमची मूळ किंमत २० लाख रुपये होती. राजस्थान रॉयल्सने त्याला ५.८० कोटी रुपयांना खरेदी केले. यानंतर शुबम दुबेने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दिल्ली कॅपिटल्सने शुभमवर पहिली बोली लावली. यानंतर दोन्ही संघात त्याला खरेदी करण्यासाठी स्पर्धा लागली. दिल्लीने ५.६० कोटीपर्यंत शेवटची बोली लावली. मात्र यानंतर राजस्थानने बाजी मारली. राजस्थानने शुभमला ५.८० कोटी रुपयांना खरेदी केले. लिलावात विकल्यानंतर शुभमचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तो अजूनही अनामिक होता. मात्र लिलावात विकल्यानंतर तो प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. राजस्थान रॉयल्सनेही शुभमचा एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार शुबम दुबे म्हणाला, “हे सर्व अविश्वसनीय आहे. मी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे मला आशा होती की लिलावात माझी निवड होईल, पण मला इतके पैसे मिळतील अशी अपेक्षा नव्हती.” आपल्या कठीण दिवसांची आठवण करून देताना तो म्हणाला, “ज्यावेळी वेळी आमची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती, त्यावेळी सुदीप सरांनी मला खूप मदत केली. त्यांच्या मदतीशिवाय मी माझ्या आयुष्यात काहीही साध्य करू शकलो नसतो.”

हेही वाचा – CSK IPL Auction 2024 : चेन्नई सुपर किंग्जने लिलावात ६ खेळाडू घेतले, १९ खेळाडू केले होते रिटेन; पाहा ‘CSK’चा संपूर्ण संघ

शुबम पुढे म्हणाला, “मला ग्लव्स घेणेही शक्य नव्हते. त्यांनी मला अंडर-१९, अंडर-२३ आणि ए डिव्हिजन संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले. त्याचबरोबर मला एक नवीन बॅट आणि किट दिले. त्यांच्या मदतीशिवाय मी विदर्भ संघात स्थान मिळवू शकलो नसतो.” सुदीप जैस्वाल हे खरे तर दुबे यांचे मार्गदर्शक होते, जे अ‍ॅडव्होकेट इलेव्हन संघ चालवायचे. या क्लबने अनेक प्रतिभावान क्रिकेटपटूंना मदत केली, जे आर्थिक कारणांमुळे क्रिकेटमध्ये प्रगती करू शकत नव्हते. सुदीप जैस्वाल यांचे कोविडमुळे निधन झाले.

हेही वाचा – IPL 2024 Auction : रिंकू सिंगकडून ५ चेंडूत सलग ५ षटकार खाणाऱ्या यश दयाळसाठी कोणी मोजले ५ कोटी? जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोण आहे शुबम दुबे?

महाराष्ट्रातील यवतमाळ येथे जन्मलेला शुबम दुबे हा डावखुरा फलंदाज आहे, जो खालच्या मधल्या फळीत फलंदाजी करतो. सुमारे १० वर्षांपूर्वी त्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती. वडील नागपूर शहरात पानाचा स्टॉल चालवायचे. त्याने सय्यद मुश्ताक अलीच्या १८७.२८ च्या स्ट्राइक रेटने २१३ धावा केल्या. बंगालविरुद्ध विदर्भाकडून खेळताना त्याने शानदार फलंदाजी केली होती. १३ चेंडू शिल्लक राखून त्याने विक्रमी लक्ष्य गाठले. पाचव्या क्रमांकावर प्रभावशाली खेळाडू म्हणून येत, त्याने फक्त २० चेंडूत ५८ धावा केल्या होत्या. त्याने आपल्या खेळीत तीन चौकार आणि सहा षटकार मारले.