Coronavirus lockdown : करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. लवकरात लवकर क्रीडा स्पर्धा सुरू व्हाव्यात आणि नवोदित खेळाडूंना संधी मिळावी, अशी भावना सर्व क्रीडापटूंच्या मनात आहे.

गांगुली ओरडून ओरडून सांगत होता, पण कैफने ऐकलंच नाही… वाचा ‘तो’ किस्सा

भारतीय खेळाडूंसोबतच परदेशी खेळाडू हळूहळू IPL च्या आयोजनाचा आग्रह धरताना दिसत आहेत, पण अद्याप करोनाचा फैलाव आणि प्रार्दुभाव कमी होण्याचे चिन्ह नाही. त्यामुळे यंदाचे IPL रद्द होण्याच्या मार्गावर आहे. १९८३ च्या विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडू मदन लाल यांनी प्रेक्षक नसलेल्या मैदानांवर IPL चे सामने खेळवण्यात काहीच अर्थ नाही, असे मत व्यक्त केले होते. याबाबत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला इ-कॉन्क्लेव्ह कोरोना सीरिजमध्ये प्रश्न विचारण्यात आला.

तेव्हा मी रात्रभर ढसाढसा रडलो – विराट कोहली

त्यावर रोहित म्हणाला की सध्या तरी करोनाच्या तडाख्यामुळे सर्वत्र हाहा:कार पसरला आहे. कोणतीही क्रीडा स्पर्धा खेळवली जात नाहीये. कोणताही देश क्रिकेट सामने खेळत नाहीये. पण जर बंद दाराआड म्हणजेच प्रेक्षकांविना IPL चे सामने खेळावे लागले, तर मी जेव्हा लहानाचा मोठा होत होतो, त्या काळात मला परत जावे लागेल. त्यावेळी आम्ही प्रेक्षक नसताना सामने खेळायचो. पण सारे नागरिक सूचनांचे योग्य पालन करून सुरक्षित राहात आहेत, अशी मला आशा आहे. जेणेकरून आपण लवकरात लॉकडाउनमधून बाहेर पडू आणि आपली आवडती कामं करू शकू, असे रोहितने सांगितले.

“…तर घाबरायचं कशाला?”; हरभजनचा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन कर्णधाराला सवाल

दरम्यान, पंतप्रधानांच्या आवाहनाला टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माने प्रतिसाद दिला. रोहितने प्रधानमंत्री सहाय्यता निधीमध्ये ४५ लाख, मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये २५ लाख, ‘फिडिंग इंडिया’साठी ५ लाख तर रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांच्या देखभालीसाठी ५ लाख अशी एकूण ८० लाखांची आर्थिक मदत केली.