डिजिटल एंटरटेनमेंट कंपनीत सचिन तेंडुलकरची दोन दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक

सचिन तेंड़ुलकर याने क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर आता डिजिटल गेमिंग क्षेत्रात पदार्पण केलं आहे. इतकंच नाही तर, सचिननं डिजिटल गेमिंगमध्ये २ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

Sachin-Tendulkar-Gaming
डिजिटल एंटरटेनमेंट कंपनीत सचिन तेंडुलकरची दोन दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक (Photo- Financial Express)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंड़ुलकर याने क्रिकेटचं मैदान गाजवल्यानंतर आता डिजिटल गेमिंग क्षेत्रात पदार्पण केलं आहे. इतकंच नाही तर, सचिननं डिजिटल गेमिंगमध्ये २ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. डिजिटल मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जेटसिंथेसिस कंपनीत त्याने गुंतवणूक केली आहे. यामुळे सचिनचे या कंपनीसोबत घट्ट नातं तयार झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. सचिन सागा क्रिकेट चॅम्पियन आणि सचिन सागा व्हिआर या खेळाचे भागिदार झाल्याने संबंध आणखी मजबूत झाले आहेत, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. सचिन सागा या गेममधे सचिन आणि गेम खेळणारी व्यक्ती यांच्यामध्ये एक आभासी बंध निर्माण करण्यात येतो.

“माझे जेटसिंथेसीसची ५ वर्षांपासून नातं आहे. आम्ही सचिन सागा क्रिकट चॅम्पियन या डिजिटल गेमच्या माध्यमातून प्रवास सुरु केला आहे. एका अनोख्या संकल्पनेसह क्रिकेट अनुभवासह तो मजबूत केला आहे. आतापर्यंत २० मिलियन लोकांनी हा गेम डाउनलोड केला आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेट खेळासाठी नवं व्यासपीठ उभं करण्याचा आमचा डिजिटल प्रयत्न असणार आहे. या माध्यमातून क्रिकेटप्रेमींना एक अस्सल गेमिंगचा अनुभव मिळणार आहे.”, असं मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याने सांगितलं.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताचा विजयी ‘पंच’; बॉक्सर सतीश कुमारची उपांत्यपूर्व फेरीत धडक

“अदार पूनावाला, क्रिस गोपाळकृष्णन यांच्या सचिन तेंडुलकर हाही कंपनीचा भागधारक झाला आहे. सचिन तेंडुलकरसारखी व्यक्ती आमच्या कुटुंबाची सदस्य झाल्याने आम्हाला आनंद झाला आहे. सचिन तेंडुलकरमुळे डिजिटल गेमिंगला नवं स्वरूप प्राप्त होईल,” असं कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजन नवानी यांनी सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sachin tendulkar has entered the online gaming segment rmt