Shreyas Iyer Ruled Out India vs New Zealand: भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे. तो पाठीच्या दुखापतीचा बळी ठरला आहे. संघ व्यवस्थापनाने श्रेयसच्या जागी रजत पाटीदारला संधी दिली आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जानेवारीपासून एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ट्विट करून अय्यरच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रेयस अय्यर हा टीम इंडियाचा प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याने अनेक प्रसंगी चमकदार कामगिरी केली आहे. पण तो १८ जानेवारीपासून खेळल्या जाणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. अय्यर हे बँकेच्या दुखापतीचे बळी ठरले आहेत. तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जाणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. अय्यरला वगळल्यानंतर रजत पाटीदारचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. रजतने देशांतर्गत सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे.

भारतीय संघाने २०२३ ची सुरुवात श्रीलंकेविरुद्धच्या मालिका विजयाने केली. विराट कोहलीचा परतलेला फॉर्म अन् शुबमन गिलची सातत्यपूर्ण कामगिरी ही भारतीय संघासाठी जमेची बाब आहे. मधल्या फळीतील प्रमुख फलंदाज श्रेयस अय्यर याला पाठीच्या दुखण्यामुळे एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे ‘मिस्टर ३६०’ अशी ओळख असणाऱ्या सूर्यकुमार यादव याचे खेळणे आता निश्चित मानले जात आहे.

बीसीसीआयने श्रेयसच्या जागी संघात रजत पाटीदार याची निवड केली गेली आहे. १८ जानेवारीला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर दुसरा सामना रायपूरमध्ये २१ जानेवारीला होणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना २४ जानेवारीला इंदोर मध्ये होणार आहे. यानंतर तीन सामन्यांची टी२० मालिका खेळवली जाईल.

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात केएस भरतचाही समावेश केला आहे आणि तो इशान किशनला मोठी टक्कर देऊ शकतो असे मानले जात आहे. पण, भरतला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी संघात अंतिम अकरामध्ये स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे. फिरकीपटूंमध्ये युजवेंद्र चहल व कुलदीप यादव यांच्यापैकी एकाला संधी मिळेल. चहलला दुखापत झाल्याने कुलदीपची संघात एन्ट्री झाली होती आणि त्याने श्रीलंकेविरुद्ध कमाल केली. त्यामुळे त्याला बाहेर काढणं हा त्याच्यावर अन्याय ठरू शकतो.

हेही वाचा: Australian Open: उष्णतेच्या त्रासाने बॉल गर्ल कोर्टवरच कोसळली, पारा ३५ अंशांवर पोहोचल्याने दुसऱ्या दिवसाचा खेळ स्थगित

भारताचा वन डे संघ ( वि. न्यूझीलंड) – रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, इशान किशन, विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत ( यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shreyas iyer ruled out shreyas iyer ruled out of odi series due to injury rajat patidar gets chance against new zealand avw
First published on: 17-01-2023 at 14:55 IST