माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलाचा रुग्णालयातील मुक्काम आणखी एका दिवसानं वाढला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने शनिवारी गांगुलीला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली आणि त्याला रूग्णालयात घेऊन जाण्यात आले. दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या खाजगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सौरव गांगुलीची प्रकृती सध्या ठीक आहे.

वूडलँड रुग्णालयान दिलेल्या माहिती नुसार, सौरव गांगुली आता क्लिनिकली तंदुरुस्त आहे. मात्र त्यांनं स्वत: आणखी एक दिवस रुग्णालयामध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उद्या (गुरुवार, ७ जानेवारी) डिस्चार्ज दिला जाणार आहे. सध्या त्यांची प्रकृती सुधारत असल्याने त्यांच्यावर होणारी अ‍ॅन्जिओप्लास्टी पुढे ढकलण्यात आली आहे.

गांगुलीला रुग्णालयातून घरी सोडल्यानंतर डॉक्टरांकडून त्याच्या प्रकृतीची दररोज माहिती घेतली जाणार आहे. “गांगुलीच्या स्वास्थ्यासंदर्भात डॉ. अश्विन मेहता (जसलोक, मुंबई) आणि डॉ. शामिन के शर्मा (माऊंट सिनाई, न्यूयॉर्क) यांचा सल्ला घेण्यात आला आहे. संचालक मंडळाकडून गांगुलीच्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल आणि प्रकृतीची पाहणी करण्यात आली आहे. हृदयविकाराचा झटका आलेला असताना वेळीच मिळालेल्या उपचारांमुळे गांगुलीची प्रकृती आता चांगली आहे.

आणखी वाचा 

रोहित शर्मा कुठल्या क्रमांकावर खेळणार, रहाणेनं केला खुलासा

विराटने ज्या कंपनीत केली गुंतवणूक त्याच कंपनीला BCCI ने दिलं कंत्राट

IND vs AUS : ४३ वर्षांनी योग जुळला; निकालही जुळणार का?

सिडनीत कशी आहे भारताची कामगिरी? जाणून घ्या आकडे

पुढील आव्हानाचा सामना करण्यासाठी नटराजन तयार, कसोटी पदार्पणाबाबत केलं महत्वाचं ट्विट

सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघात महत्वाचे दोन बदल; कर्णधार, प्रशिक्षकानं दिले संकेत

जाफर गुरुजींचा कानमंत्र : वॉर्नरला बाद करण्यासाठी पंतला दिला सांकेतिक सल्ला, तुम्हाला कळतोय का पाहा

पाकिस्तानचा दारुण पराभव; न्यूझीलंड ICC क्रमवारीत अव्वल