Sunil Gavaskar Picks India’s Best Playing XI: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जून २०२३ पासून इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ इंग्लंडमध्ये पोहोचला आहे. सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत जोरदार चर्चा रंगत आहेत. अशा परिस्थितीत माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी टीम इंडियाच्या बेस्ट प्लेइंग इलेव्हनची निवड केली आहे. यामध्ये त्यांनी तीन गोलंदाज आणि दोन अष्टपैलू खेळाडूंची निवड केली.

गिल आणि रोहित सलामी देतील –

स्टार-स्पोर्ट्सशी बोलताना गावसकर म्हणाले की, “फलंदाजीबद्दल बोलायचे तर रोहित आणि गिल डावाला सुरुवात करतील, तर तिसऱ्या क्रमांकावर पुजारा, चौथ्या क्रमांकावर कोहली आणि पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे माझ्या संघात असतील. सहावा क्रमांक हा चिंतेचा विषय आहे. मला वाटते की या क्रमांकावर केएस भरत किंवा इशान किशन यापैकी एकाला खेळवले जाईल.”

केएस भरतने आतापर्यंतचे सर्व सामने खेळले असल्याने तो खेळणार असल्याचे वृत्त आहे. अशा स्थितीत केएस भरत सहाव्या क्रमांकावर खेळेल. इशानला कसोटी क्रिकेटचा फारसा अनुभव नसल्याचेही एक कारण आहे. त्याने अद्याप एकही कसोटी खेळलेली नाही.

हेही वाचा – WTC Final 2023: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! ‘हा’ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे संघातून झाला बाहेर

गावसकर पुढे म्हणाले की, “माझ्या संघात सातव्या क्रमांकार रवींद्र जडेजा असेल. जर दिवसा सूर्यप्रकाश राहिल्यास आणि भविष्यातही असेच अंदाज बांधले गेले, तर मला वाटते जडेजा आणि आर आश्विन सातव्या आणि आठव्या क्रमांकावर खेळतील. त्याच वेळी, उर्वरित तीन खेळाडू मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शक्यतो शार्दुल ठाकूर असतील.”

सुनील गावसकरांची बेस्ट प्लेइंग इलेव्हन –

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर.

हेही वाचा – ‘शुबमन गिल हा भावी सुपरस्टार’, पाकिस्तानच्या दिग्गजाने भारताच्या युवा फलंदाजाची सचिन तेंडुलकरशी केली तुलना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डब्ल्यूटीसी फायनलसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकीपर).