scorecardresearch

ICC T20 Ranking: सूर्याने मोडला विराटचा टी-२० क्रिकेटमधील मोठा विक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील तिसरा फलंदाज

Surya Broken Virat Kohli’s Record: सूर्यकुमार यादवने टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या टी-२० क्रमवारीचा सूर्यकुमार यादवला मोठा फायदा झाला आहे. ज्यामध्ये तो सर्वाधिक गुण मिळवणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.

Suryakumar Yadav has broken Virat Kohli's record for scoring the most points in the T20 rankings
सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली (फोटो- संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

सूर्यकुमार यादवसाठी टी-२० क्रिकेट हा डाव्या हाताचा खेळ बनला आहे. जेव्हा तो मैदानात उतरतो तेव्हा पहिल्याच चेंडूपासून तो गोलंदाजांवर आक्रमन करण्यास सुरुवात करतो. तो सध्या टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन फलंदाज आहे. बुधवारी जाहीर झालेल्या आयसीसी टी-२० क्रमवारीत त्याने आणखी एक विक्रम केला. सूर्याने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी विराट कोहलीचा विक्रमही मोडला आहे.

भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग गाठले आहे. रेटिंग गुणांच्या बाबतीत तो आता डेव्हिड मलानच्या सर्वोत्तमपेक्षा थोडा मागे आहे. मलानने टी-२० क्रिकेटमध्ये रँकिंगच्या शिखरावर असताना ९१५ रेटिंग गुण मिळवले होते. आता सूर्याने ९१० रेटिंग गुण मिळवले आहेत. प्रथमच कोणत्याही भारतीयाने ९०० गुणांचा टप्पा ओलांडला आहे.

सूर्यापूर्वी, विराट कोहली टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वोत्तम क्रमांक एक होता, परंतु त्याच्याकडे ८९७ रेटिंग गुण होते. सूर्यकुमार यादवने हा विक्रम मोडला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ९०० किंवा त्याहून अधिक रेटिंग गुण मिळवणारा तो जगातील तिसरा खेळाडू आहे. या यादीत अॅरॉन फिंच हा तिसरा खेळाडू आहे.

हेही वाचा – Virat Kohli Interview: विराट कोहलीला ‘या’ महिलेसोबत करायचं होतं डिनर; व्यक्त केली मनातली इच्छा, पाहा VIDEO

सध्याच्या काळात करिअरच्या सर्वोत्तम रँकिंगच्या बाबतीत डेव्हिड मलान ९१५ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव असून त्याचे ९१० गुण आहेत. अॅरॉन फिंचने अव्वल स्थानावर असताना ९०० रेटिंग गुण मिळवले आहेत. या यादीत विराट कोहली चौथ्या स्थानावर आहे, ज्याचे गुण ८९७ होते. पाचव्या स्थानावर बाबर आझमचे नाव आहे, ज्याने ८९६ रेटिंग पॉइंट्स मिळवले होते.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-02-2023 at 16:10 IST