ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी२० विश्वचषक २०२२च्या स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून १० विकेट्सने दारूण पराभव स्विकारावा लागला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्स गमावत १६८ धावा केल्या. यामध्ये हार्दिक पंड्या याच्या ३३ चेंडूत केलेल्या ६३ धावांचा समावेश आहे. १० षटके संपली जेव्हा भारताने ६२ धावसंख्या उभारली होती. याचाच आधार घेत हार्दिक पांड्याने सूर्यकुमार यादवकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि माजी कर्णधार विराट कोहलीवर केला आहे.

टी२० विश्वचषकात भारताचा उपांत्य फेरीत पराभव झाल्यानंतर आता संघातूनही आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने सूर्यकुमार यादवबाबत भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि माजी कर्णधार विराट कोहलीला लक्ष केले आहे. “सूर्यासारख्या ३६० डिग्री खेळणाऱ्या प्रतिभावान खेळाडूकडे दुर्लक्ष झाल्याने आज ही वेळ भारतीय संघावर ओढवली आहे असा अप्रत्यक्षपणे आरोप त्याने केला. सूर्यकुमार यादवला जर दोन-तीन वर्षापूर्वी संघात सामील केले असते तर आज टीम इंडियाला मधल्याकाळातील अडचणी दूर करत्या आल्या असत्या.” असा आरोप त्याने शास्त्री आणि कोहली यांच्या काळातील धोरणांवर टीका करताना केला आहे.

हार्दिक पांड्या पुढे बोलताना म्हणाला की, “ एका वर्षात १००० धावा करणारा आणि आयसीसी क्रमवारीत अव्वलस्थान पटकावण्याऱ्या सूर्यासारख्या हिऱ्याची पारख ही लवकरच व्हायला हवी होती. तेव्हाच्या संघ व्यवस्थापनाने याकडे दुर्लक्ष केले असा अप्रत्यक्ष निशाना त्याने रवी शास्त्री आणि विराट कोहलीवर केला आहे.”

हेही वाचा :   प्रो.कब्बडी लीग: महाराष्ट्र डर्बी दुसऱ्या लढतीत यु मुंबाने काढला पराभवाचा वचपा, पुणेरी पलटणची हाराकिरी

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २००७ मध्ये एकमेव टी२० विश्वचषक जिंकला होता. या दोन संघांमधील मोठ्या फरकाबद्दल बोलताना, २००७ च्या अंतिम सामन्यात खेळलेल्या संघातील एकही खेळाडू ३० वर्षांपेक्षा कमी वयाचा नव्हता. त्यावेळी धोनी स्वतः २६ वर्षांचा होता. आतापर्यंतच्या टी२० विश्वचषकात भारताला एकही चषक जिंकता आला नाही. २००७ नंतर तसे भारता अजूनही टी२० विश्वचषक जिंकण्याच्या प्रतीक्षेतच आहे.