scorecardresearch

IND vs SA ODI Squad: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, धवन कर्णधार, श्रेयस उपकर्णधार

कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहल यांच्यासह वरिष्ठ खेळाडूंना टी२० विश्वचषकापूर्वी विश्रांती देण्यात आली आहे.

IND vs SA ODI Squad: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, धवन कर्णधार, श्रेयस उपकर्णधार
प्रातिनिधीक छायाचित्र (लोकसत्ता)

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. शिखर धवन संघाचे नेतृत्व करेल. त्याचबरोबर श्रेयस अय्यरला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. श्रेयसचेही संघात पुनरागमन झाले आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतही तो खेळला नव्हता.

रजत पाटीदार आणि मुकेश कुमार हे संघातील नवे चेहरे आहेत. त्याची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि युझवेंद्र चहल यांच्यासह वरिष्ठ खेळाडूंना टी२० विश्वचषकापूर्वी विश्रांती देण्यात आली आहे. टी२० विश्वचषकासाठी संघात निवड न झालेल्या संजू सॅमसनचीही संघात निवड झाली आहे. सॅमसनने अलीकडेच न्यूझीलंड-अ विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारत-अ संघाचे नेतृत्व केले होते. गेल्या सामन्यातही त्याने अर्धशतक झळकावले होते.

रजत आणि मुकेश यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी

एकदिवसीय मालिकेदरम्यान, विश्वचषकासाठी निवडलेला संघ तयारीसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो. नुकत्याच झालेल्या रणजी करंडक आणि दुलीप चषकामध्ये रजत पाटीदारने शानदार कामगिरी केली होती. त्याचवेळी राजकोट येथे सुरू असलेल्या इराणी चषक आणि भारत-अ मध्ये खेळताना मुकेशने न्यूझीलंड-अ विरुद्ध चमकदार कामगिरी केली. मुकेशने न्यूझीलंड-अ विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातही पाच बळी घेतले होते. त्याचबरोबर गोलंदाज मुकेश कुमारला देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे.

धवन आणि शुभमन सलामीवीर

संघात निवडले गेलेले बहुतेक खेळाडू झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळलेले आहेत. सलामीची जबाबदारी पुन्हा एकदा धवन आणि शुभमन गिल यांच्यावर असेल. त्याचबरोबर मधल्या फळीची जबाबदारी श्रेयस, इशान किशन, संजू सॅमसन यांच्यावर असेल. फिरकीची जबाबदारी अष्टपैलू शाहबाज अहमद, रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव यांच्यावर असेल. शाहबाज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पदार्पण करू शकतो. शाहबाज आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो.

हेही वाचा :  Legends League Cricket: भर मैदानात युसुफ पठाण आणि मिचेल जॉन्सन एकमेकांना भिडले, पंचांना केली मध्यस्थी व्हिडिओ व्हायरल

त्याचबरोबर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी दीपक चहर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, आवेश खान आणि मुकेश कुमार यांच्यावर असेल. रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी आणि ऋतुराज गायकवाड यांना पहिल्या काही सामन्यांमध्ये बेंचवर बसावे लागू शकते. या मालिकेची सुरुवात ६ ऑक्टोबर रोजी लखनौमध्ये पहिल्या एकदिवसीय सामन्याने होईल. याआधी दोन्ही संघ टी२० मालिकेत आमनेसामने आले आहेत. दीपक चहर, श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई हे टी२० विश्वचषकासाठी स्टँडबाय आहेत. अशा परिस्थितीत संघाला त्याला आणखी एका मालिकेत आजमावायचे आहे, जेणेकरून त्याचा सामना सराव कायम राहील. मात्र, या मालिकेत कोरोनामधून सावरत असलेल्या मोहम्मद शमीची निवड झाली नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

भारत संघ

शिखर धवन (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, मुकेशकुमार आवेश खान, मोहम्मद सिराज, दीपक चहर.

दक्षिण अफ्रीका संघ

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, येनेमन मलान, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नोर्टजे, वेन पारनेल, एंडिले फेहलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, काबरेज्बा, काबरेसी, ड्वेन.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या