scorecardresearch

WTC 2023: पत्रकार परिषदेत रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला, “WTC फायनलच्या तयारीसाठी आयपीएलमध्ये…”

कर्णधार रोहित शर्माने पीटीआयच्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं, “हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही त्या सर्व खेळाडूंसोबत नेहमी संपर्कात राहू आणि….”

Rohit Sharma Statement On WTC 2023
रोहिर शर्माचं पत्रकार परिषदेत मोठं विधान. (Image-Indian Express)

Rohit Sharma Statement On WTC Final : बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेला अखेरचा चौथा कसोटी सामना अनिर्णीत राहिला. त्यामुळे भारताने २-१ ने आघाडी घेत या मालिकेवर विजय संपादन केलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना रंगला. तत्पुर्वी, न्यूझीलंडने श्रीलंकेचा पहिल्या कसोटी सामन्यात पराभव केल्याने भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा प्रवेश निश्चित झाला. हा कसोटी सामना अनिर्णीत ठरल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं आहे.

रोहितनं पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं की, ज्या भारतीय खेळाडूंचे इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023)चे संघ या टी २० लीगच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करणार नाहीत, ते खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याआधी लंडनमध्ये दोन आठवड्याच्या शिबिरात सहभाग घेऊ शकतात. डब्ल्यूटीसी फायनल आयपीएलनंतर लगेच जूनमध्ये खेळवण्यात येणार आहे. आयपीएल फायनल २९ मेला आहे. तर डब्ल्यूटीसी फायनल ७ जूनला ओव्हलमध्ये सुरु होईल.

नक्की वाचा – ‘WTC’ च्या फायनलमध्ये भारताची एन्ट्री! गूड न्यूज मिळताच विराटने मैदानातच केलं असं काही…Video झाला व्हायरल

कोविड १९ नंतर पहिल्यांदाच घरेलू मैदानावर आयपीएल खेळवण्यात येणार आहे. भारताच्या कसोटी खेळाडू्ंमध्ये फक्त चेतेश्वर पुजाराचा आयपीएलमध्ये सहभाग नाहीय. ऑस्ट्रेलिया विरोधात झालेली कसोटी मालिका २-१ ने जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने पीटीआयच्या एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं, “हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आम्ही त्या सर्व खेळाडूंसोबत नेहमी संपर्कात राहू, जे डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये खेळणार आहेत. तसंच त्यांच्या कार्यक्षमतेकडेही लक्ष ठेवू. जेणेकरून त्यांच्यासोबत काय होत आहे, याबाबत आम्हाला माहिती मिळेल. २१ मे पर्यंत सहा संघ आयपीएलच्या प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर जे खेळाडू उपलब्ध असतील, ते खेळाडू लवकरात लवकर ब्रिटनला पोहोचतील,यासाठी आम्ही प्रयत्न करू.”

तीन मुख्य वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (रॉयल चेलॅंजर्स बेंगलोर), मोहम्मद शमी (गुजरात टायटंस), उमेश यादव (कोलकाता नाईट रायडर्स) त्यांच्या फ्रॅंचायजीसाठी नियमितपणे खेळण्याची अपेक्षा आहे. त्यांच्या १४ ग्रुप लीग खेळातून कमीत कमी १२ मध्ये खेळण्याची शक्यता आहे आणि अशा परिस्थितीत त्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवणं महत्वाचं ठरणार आहे.

रोहितने म्हटलं, “आम्ही सर्व वेगवान गोलंदाजांना काही (लाल) ड्यूक चेंडू पाठवत आहोत. त्यांना यामुळे गोलंदाजी करण्याचा वेळ मिळतो. पण सर्व त्या खेळाडूंवर अवलंबूत असतं. भारता एसजी टेस्ट आणि ऑस्ट्रेलिात कूकाबूरा, तर इंग्लंडमध्ये ड्यूक चेंडूने टेस्ट खेळवली जाते. शमी,उमेश आणि सिराज सामन्यांतून आणि व्यस्त कार्यक्रमातून किती वेळ काढतात, हे पाहावं लागेल. पण टेस्ट टीमच्या बहुतांश सदस्यांसाठी इंग्लंड नवीन जागा नाहीय. कारण ते सर्व खेळाडू त्या ठिकाणी मालिका खेळले आहेत आणि काही खेळाडूंनी काउंटी क्रिकेटही खेळलं आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 08:41 IST