scorecardresearch

Premium

‘खेळाडूंमधील स्पर्धा वाढल्यामुळेच निवड चाचणीचा नियम आवश्यक’

आम्ही खेळत होतो, तेव्हा खेळाडूंमध्ये फारशी स्पर्धा नव्हती. मात्र, आता देशांतर्गत पातळीवर ही स्पर्धा वाढली आहे.

Yogeshwar Dutt
(योगेश्वर दत्त)( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

पीटीआय, नवी दिल्ली

आम्ही खेळत होतो, तेव्हा खेळाडूंमध्ये फारशी स्पर्धा नव्हती. मात्र, आता देशांतर्गत पातळीवर ही स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे ऑलिम्पिक पात्रतेसाठी केलेला नियम आवश्यक असून, त्याकडे आपण कसे बघतो यावर नियम वाईट की चांगला हे ठरते, असे मत ऑलिम्पिक पदकविजेता मल्ल योगेश्वर दत्तने व्यक्त केले.ऑलिम्पिक पात्रतेसाठी हंगामी समितीने कोटा मिळविणाऱ्या मल्लास आव्हानवीराशी लढावे लागेल आणि त्या लढतीतील विजेता ऑलिम्पिकला जाईल असा नियम केला आहे. या नियमाबद्दल कुस्ती वर्तुळात संमिश्र प्रतिक्रिया उमटली आहे. काही खेळाडूंनी बोलण्यास नकार दिला, तर योगेश्वरने नियम चांगला किंवा वाईट असे कुठलेच थेट विधान केले नाही.

ITTF World Table Tennis Team Championship Updates
Paris Olympics : भारतीय टेबल टेनिस संघांनी रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकसाठी ठरले पात्र
Manoj Tiwary vs MS DHoni
“माझ्याकडे गमावण्यासाठी काही नाही, त्यामुळे मी धोनीला विचारेन…”, निवृत्तीनंतर मनोज तिवारीने व्यक्त केली खंत
U19 PLayers
१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतले किती खेळाडू पुढे वरिष्ठ संघाकडून खेळतात? भारतासह जगभरातल्या देशांची स्थिती काय?
U 19 world cup match , Which players of India are especially expected in the final match of the Under 19 World Cup 2024
युवा विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्यात भारताच्या कोणत्या खेळाडूंकडून विशेष अपेक्षा?

‘‘आम्ही खेळत असताना जो मल्ल देशाला ऑलिम्पिक कोटा मिळवून द्यायचा, तोच ऑलिम्पिकमध्ये खेळायचा. मात्र, आता हंगामी समितीने त्याबाबत केलेला नियम हे त्यांचे धोरण आहे. नियम बनवणे किंवा सुधारणे हे त्यांचे काम आहे. त्याचा आदर करणे हे खेळाडूचे काम आहे,’’ असे योगेश्वरने नमूद केले.‘‘आपण नियमाकडे कसे बघतो यावर तो योग्य आहे की अयोग्य हे ठरते. या नियमाला दोन बाजू आहेत. एक म्हणजे ज्या मल्लाचे ऑलिम्पिक खेळण्याचे उद्दिष्ट असेल, तो या लढतीसाठी तयारी करेल. दुसरी बाजू म्हणजे आपण कोटा मिळवूनही जाऊ शकत नाही याचे शल्य त्याला बोचत राहील,’’ असे योगेश्वर म्हणाला.

हेही वाचा >>>Ind vs Aus: धावांच्या शर्यतीत गोलंदाजांची कमाल; भारताची ऑस्ट्रेलियावर सरशी

‘‘मी आणि सुशील कुमार सलग ऑलिम्पिक खेळलो. मात्र, तेव्हा आम्हाला आमच्या वजनी गटात स्पर्धाच नव्हती. आता प्रत्येक वजनी गटात मल्ल तयार होत आहेत. त्यांनाही संधी मिळणे आवश्यक आहे. देशामध्ये स्पर्धा वाढल्याचे हे द्योतक आहे,’’ असे मत योगेश्वरने मांडले.जागतिक स्पर्धेतील माजी विजेती सरिता मोरने आपल्याला नियम किंवा धोरण याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले. 

विनेशला खेळता यावे यासाठी नियम?

भारतीय कुस्तीगीर महासंघाच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या विनेश फोगटसाठी हे सगळे प्रयत्न नाहीत ना, अशी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली एकमेव मल्ल अंतिम पंघाल ही ५३ किलो वजनी गटातील असून, विनेशही याच गटातून आंतरराष्ट्रीय पदक विजेती आहे. आव्हानवीरांची नावे ३१ मे रोजी निश्चित केली जातील असे सांगतिले जात असले, तरी आतापासूनच अंतिमविरुद्ध विनेश अशी लढत होईल, असेच चित्र आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The rule of selection test is necessary because of the increased competition among the players amy

First published on: 27-11-2023 at 01:23 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×