बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर आता नव्या वर्षात टीम इंडियासमोर तीन बलाढ्य संघांचे आव्हान असणार आहे. जानेवारी ते मार्चपर्यंत भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० आणि एकदिवसीय मालिकेने त्याची सुरुवात होईल.

भारतीय संघाच्या घरच्या मालिकेचे अधिकृत प्रसारक स्टार स्पोर्ट्सने रविवारी (२५ डिसेंबर) सोशल मीडियावर भारत विरुद्ध श्रीलंका टी२० मालिकेचा प्रोमो व्हिडिओ अपलोड केला. हा व्हिडिओ हार्दिक पांड्यावर चित्रित करण्यात आला आहे. अखेर पोस्टरमध्ये हार्दिक पांड्याला श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकासोबत दाखवण्यात आले आहे. स्टार स्पोर्ट्सने आपली चूक लक्षात येताच आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून व्हिडिओ हटवला. मात्र, तोपर्यंत हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हार्दिक पांड्याला टॅग करत, स्टार स्पोर्ट्सने लिहिले की, “हार्दिक पांड्या आंतरराष्ट्रीय आशियाई टी२० विजेत्यांविरुद्ध धमाकेदारपणे नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. हार्दिक ‘राज’मधील या नव्या टीम इंडियासोबत काही लढण्यासाठी सज्ज व्हा. मात्र आता प्रश्न असा पडतो की बीसीसीआयने अद्याप हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही, तर अधिकृत प्रसारकांनी हार्दिक पांड्याला भारतीय संघाच्या कर्णधारपदी कसे दाखवले? तेही प्रोमो व्हिडिओत? सोशल मीडियावर चाहत्यांनी चांगलंच स्टार स्पोर्ट्सला धारेवर धरत प्रश्न विचारून हैराण केले. यानंतर स्टार स्पोर्ट्सने ट्विटरवरून व्हिडिओ काढून टाकला आहे, परंतु व्हिडिओ अद्याप इन्स्टाग्रामवर अपलोड आहे.

हार्दिक पांड्याने अलीकडेच न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय टी२० संघाचे नेतृत्व केले. पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने किवी संघाविरुद्धची मालिका १-० अशी जिंकली. यानंतर हार्दिक पांड्याकडे टी२० संघाचे कर्णधारपद सोपवले जाणार असल्याचे बोलले जात आहे. रोहित शर्माऐवजी टी२० संघाचे कर्णधारपद पांड्याकडे देण्यात यावे, असे लोकांचे म्हणणे होते. मात्र, रोहित यापुढे टी२० संघाचे कर्णधारपद भूषवणार नसल्याची शक्यता वर्तवली जात असून त्याच्या जागी हार्दिक पांड्या संघाची धुरा सांभाळणार आहे.

हेही वाचा: Cricketers Celebrates Christmas: रोहित बनला सांताक्लॉज…तर धोनी दिसला मुलीसोबत, पाहा कसा साजरा केला क्रिकेटर्सनी ख्रिसमस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने त्यांच्या पदार्पणाच्या मोसमात आयपीएलचे विजेतेपद पटकावले. आयपीएलपासून हार्दिक फॉर्ममध्ये आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी२० मालिका ३ जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आहे. रोहित टी२० मालिकेत खेळणार नाही. रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे, त्यामुळे मर्यादित षटकांच्या एकदिवसीय मालिकेतही त्याचे खेळणे साशंक आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत कर्णधारपद भूषवताना दिसू शकतो.