Virat Kohli completed 16 years in international cricket : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १६ वर्षे पूर्ण केली आहेत. विराट कोहलीने १८ ऑगस्ट २००८ रोजी श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. विराटचा पदार्पणाचा सामना काही खास नव्हता आणि तो केवळ १२ धावा करून बाद झाला होता. यानंतर विराट कोहलीने अनेक मोठ्या विक्रमाला गवसनी घातली आहे. आज तो यशाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान आहे.

‘किंग कोहली’ आणि ‘द रन मशीन’ या नावाने क्रिकेटविश्वात प्रसिद्ध असलेल्या विराटने क्रिकेटच्या विश्वात वर्चस्व निर्माण केले आहे. तो जीवनात अनेक अडचणींमधून गेला, विशेषत: जेव्हा तो खराब फॉर्ममध्ये होता. त्याची बांधिलकी, क्रिकेटची आवड आणि कठोर परिश्रम त्याला नव्या उंचीवर घेऊन गेले. विराट कोहलीने टीम इंडियाला टी-२० विश्वचषक २०२४ जिंकून दिल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली. आता तो भारतासाठी फक्त एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळतो.

विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध केले होते आंतरराष्ट्रीय पदार्पण –

१८ ऑगस्ट २००८ रोजी विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला. त्यानंतर त्याने टीम इंडियासाठी सलामी दिली होती. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने २२ चेंडूत १२ धावा केल्या, ज्यात एका चौकाराचा समावेश होता. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, तेव्हा टीम इंडियाची धुरा महेंद्रसिंग धोनीच्या हाती होती. ज्या सामन्यातून विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्या सामन्यातील भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील ९ खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. रोहित शर्मा हा एकमेव खेळाडू आहे जो अजूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत आहे.

हेही वाचा – विनेश फोगटने गावात पोहोचल्यावर काका महावीर यांना मारली मिठी; म्हणाली, ‘लढा अजून संपलेला नाही…’, पाहा VIDEO

विराट कोहलीच्या पदार्पणाच्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हन :

गौतम गंभीर, विराट कोहली, सुरेश रैना, युवराज सिंग, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), इरफान पठाण, हरभजन सिंग, झहीर खान, प्रज्ञान ओझा, मुनाफ पटेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – WTC Point Table : दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने पाकिस्तानला धक्का, डब्ल्यूटीसीमध्ये झाला बदल, भारत कितव्या स्थानी?

विराट कोहलीच्या नावावर मोठ्या विक्रमांची नोंद –

  • सचिन तेंडुलकर (१००) नंतर विराट कोहली (८०) सर्वाधिक शतके झळकावणार दुसरा खेळाडू आहे.
  • विराटने वनडेत सचिन तेंडुलकरला (४९) मागे टाकत शतकांचे अर्धशतक पूर्ण केले आहे.
  • विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सहा वर्षे कसोटीत पहिल्या क्रमांकावर राहिला.
  • विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा जगातील चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.
  • सध्या क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट एकमेव फलंदाज आहे.
  • कोहलीने कर्णधार म्हणून सात द्विशतके झळकावली आहेत. त्याने वॅली हॅमंड आणि महेला जयवर्धने यांची बरोबरी केली आहे.
  • ५००० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा विराट कोहली चौथा भारतीय आणि जगातील नववा खेळाडू आहे.