८ मे रोजी बंगळुरुत पार पडलेल्या बैठकीत बीसीसीआयच्या निवड समितीने आगामी अफगाणिस्तान, आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. अफगाणिस्तान कसोटीचा अपवाद वगळता इतर सर्व सामन्यांसाठी विराट कोहलीकडे भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलेलं आहे. मात्र निवड समितीने संघाची निवड करताना, विराट कोहलीच्या काउंटी क्रिकेटचं वेळापत्रक लक्षात घेतलेलं नाहीये. या घोळामुळे विराट कोहलीला सरे क्रिकेट क्लबकडून काउंटी क्रिकेट खेळायचं की आयर्लंडविरुद्ध भारतीय संघाचं नेतृत्व करायचं हा यक्षप्रश्न पडला आहे.

अवश्य वाचा – अफगाणिस्तान, इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा

संपूर्ण जुन महिना विराट आमच्याकडून खेळण्यासाठी उपलब्ध आहे. २५ ते २८ जून या कालावधीत सरे संघाचा यॉर्कशायर विरुद्ध सामना रंगणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे २७ आणि २९ जुनरोजी भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध टी-२० सामने खेळणार आहे. त्यामुळे या दोन्ही सामन्यांच्या तारखा एकाच कालावधीत येत असल्यामुळे विराट नेमक्या कोणत्या संघाकडून खेळणार हा प्रश्न आता चाहत्यांसमोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे निवड समितीने संघाची निवड करताना विराट कोहलीचा काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी झालेला करार लक्षात घेतला नव्हता का असा प्रश्न विचारला जात आहे.

आयर्लंडविरुद्ध २ टी-२० सामन्यांसाठी भारताचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सुरेश रैना, मनिष पांडे, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सिद्धार्थ कौल, उमेश यादव</p>