Virat Kohli Nephew: विराट कोहलीने टी-२० क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. पण आता कोहली कुटुंबातून अजून एक क्रिकेटपटू क्रिकेटच्या मैदानावर पाऊल ठेवत आहे. विराट कोहलीचा पुतण्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये उतरत आहे.

दिल्ली प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाचा लिलाव २ आणि ३ जुलै रोजी होणार आहे आणि दिल्लीचे अनेक उदयोन्मुख खेळाडू यात सहभागी होताना दिसतील. या खेळाडूंमध्ये एक नाव आहे आर्यवीर कोहली, जो विराटचा पुतण्या आहे. लक्षवेधक गोष्ट म्हणजे यावेळी वीरेंद्र सेहवागचे दोन्ही लेक आर्यवीर आणि वेदांत सेहवाग हे देखील या लीगमध्ये दिसणार आहेत. डीपीएलच्या बोलीसाठी या दोघांचीही नावे निवडण्यात आली आहेत.

आर्यवीर कोहली हा विराट कोहलीचा मोठा भाऊ विकास कोहलीचा मुलगा आहे. आर्यवीर कोहली हा त्याचा काका विराटसारखा फलंदाज नाही तर एक फिरकीपटू आहे. तो पश्चिम दिल्ली क्रिकेट अकादमीमध्ये विराट कोहलीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतो. आर्यवीर कोहलीला लिलावाच्या सी श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.

गेल्या हंगामात त्याने दिल्ली अंडर १६ मध्ये नोंदणी केली होती. आर्यवीर आयपीएल दरम्यान विराट कोहलीसह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या जर्सीमध्ये दिसायचा पण आता हा खेळाडू दिल्ली प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे.

वीरेंद्र सेहवागचे दोन्ही लेक दिल्ली प्रीमियर लीगच्या लिलावात

वीरेंद्र सेहवागचे दोन्ही लेक दिल्ली प्रीमियर लीगमध्ये दिसणार आहेत. आर्यवीर सेहवागच्या मोठ्या मुलाचं नावे आहे, जो १७ वर्षांचा आहे. सेहवागचा मोठा लेक दिल्लीच्या अंडर-१९ संघाचा भाग आहे आणि हल्लीच त्याने मेघालयविरूद्ध २९७ धावांची विस्फोटक खेळी केली होती. या खेळाडूला दिल्ली प्रीमियर लीगच्या बी कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे. सेहवागचा दुसरा मुलगा वेदांत सेहवाग यालाही बी कॅटेगरीमध्ये ठेवण्यात आलं आहे, तो दिल्लीच्या अंडर-१७ संघाचा भाग आहे. वेदांत एक ऑफस्पिनर आहे.

दिल्ली प्रीमियर लीगमध्ये दोन नवे संघ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिल्ली प्रीमियर लीगमध्ये यंदा दोन नवे संघ खेळणार आहेत. यामध्ये ईस्ट दिल्ली रायडर्स, नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्स, वेस्ट दिल्ली लायन्स, साउथ दिल्ली सुपरस्टार्स, ओल्ड दिल्ली-सिक्स आणि सेंट्रल दिल्ली किंग्ज यांचा समावेश आहे. यावेळी आउटर दिल्ली आणि नवी दिल्ली फ्रँचायझी देखील मैदानावर दिसतील. गेल्या वेळी प्रियांश आर्यसारखा खेळाडू या लीगमधून प्रसिद्धीच्या झोतात आला होता. दिल्ली प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात प्रियांश आर्यने ६ चेंडूत ६ षटकार मारले होते. त्यानंतर पंजाब किंग्जने प्रियांशवर ३ कोटी ८० लाख रूपयांची बोली लावली. त्याने यासह आयपीएल २०२५ मध्ये चमकदार कामगिरी करत ५४५ धावा पहिल्याच हंगामात केल्या.