Wasim Akrma on Coach: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमला नुकतेच विचारण्यात आले की, त्याला पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक व्हायचे आहे की ऑस्ट्रेलियाचे, तेव्हा त्याने ऑस्ट्रेलियाचे नाव घेतले. यामागचे कारणही त्याने सांगितले. ऑस्ट्रेलियन संघाचा मुख्य प्रशिक्षक झाल्यास तो आपले काम चोखपणे पार पाडू शकेल, कारण तेथे दबाव कमी होईल, असा विश्वास वसीम अक्रमला आहे. वास्तविक, आशियाई देशांमध्ये क्रिकेटची खूप क्रेझ आहे, म्हणूनच जेव्हा संघ चांगली कामगिरी करत असतो, तेव्हा खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे खूप कौतुक होते. त्याचवेळी संघ वाईट काळातून जात असताना चाहते टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशा परिस्थितीत खेळाडू आणि सपोर्ट स्टाफवर खूप दबाव असतो.

स्पोर्ट्सकीडावरील ‘धिस ऑर दॅट’च्या प्रश्नमंजुषादरम्यान वसीम अक्रमने पाकिस्तानऐवजी ऑस्ट्रेलियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याबाबत चर्चा केली. त्याने उत्तर दिले, “जर तुम्ही मला हा पर्याय देत असाल तर मी ऑस्ट्रेलियाची निवड करेन. माझ्या बायकोमुळे नाही, पण तिथं दडपण कमी होईल आणि मी माझं काम व्यवस्थित करू शकेन. मात्र, असे होणे कठीण आहे. ऑस्ट्रेलियाकडे त्यांचे स्वतःचे माजी खेळाडू खूप आहेत त्यामुळे माझा नंबर लागणे कठीण आहे.”

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
lok sabha election in punjab four way contest in punjab bjp contest elections alone in punjab
Lok Sabha Polls 2024: पंजाबमधील चौरंगी सामन्यात दलबदलूंवरच भिस्त

यावेळी वसीम अक्रमला आयपीएल आणि पीएसएलबाबत प्रश्न विचारण्यात आले. आयपीएल ही जगातील सर्वात मोठी लीग आहे, तर पीएसएल पाकिस्तानमध्ये खूप लोकप्रिय आहे. पाकिस्तान अनेकदा आपल्या लीगची तुलना आयपीएलशी करतो. याबरोबरच त्याने पीएसएलला पाकिस्तानची मिनी आयपीएल असेही संबोधले. तो म्हणाला, “मी दोन्हीमध्ये काम केले आहे. तुम्ही आयपीएल आणि पीएसएलची तुलना करू शकत नाही. आयपीएल खूप मोठी आहे. पाकिस्तानमध्ये पीएसएल खूप मोठी आहे, यात शंका नाही. ही पाकिस्तानमधील मिनी आयपीएलसारखी आहे.”

हेही वाचा: दुखापतींचा संघनिवडीवर परिणाम;आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, समदचा समावेश

विराट कोहली की बाबर आझम यांच्या तुलनेवर वसीम अक्रमने सूचक विधान केले

पाकिस्तानचा माजी गोलंदाज वसीम अक्रमने अखेर या दोघांमध्ये सर्वोत्तम कोण? याचे उत्तर सांगूनच टाकले. खरंतर, खेळाच्या बाबतीत, बाबर आझम आणि विराट कोहली यांच्यातील सर्वोत्तम फलंदाज कोण या प्रश्नावर वसीमने आपले अंतिम मत दिले आहे. वसीमने थेट विराट कोहलीला (कोहली विरुद्ध बाबर आझम) सर्वोत्कृष्ट खेळाडू घोषित केले आहे. याबाबत बोलताना वसीम म्हणाला, “बाबर आझम सध्या आपलं करिअर पुढे नेत आहे. बाबर हा आधुनिक महान फलंदाज आहे. पण विराटने ज्या प्रकारे करिअर घडवलं आहे ते खूप मोठं आहे, क्रिकेटमधलं त्याचं नाव सुवर्णाक्षरांनी लिहिलं जात आहे आणि ते लिहायलाच हवे. तो नक्कीच महान आहे, यात काही शंका नाही.” वसीमच्या या उत्तराने भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत.

अलीकडेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात, कोहलीने शानदार अर्धशतक झळकावले आणि दुसऱ्या डावात तो एकटा खेळपट्टीवर उभा होता. जरी भारताला एक डाव आणि ३२ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी कोहलीच्या खेळीने चाहत्यांची मने जिंकली. विराटने भारताच्या दुसऱ्या डावात ८२ चेंडूत ७६ धावांची खेळी केली.

हेही वाचा: कुस्ती स्पर्धा तातडीने सुरू करा! ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर बजरंग पुनियाचे सरकारला आवाहन

कोहली जरी भारताला विजयापर्यंत नेऊ शकला नसला तरी त्याने एक अप्रतिम विक्रम आपल्या नावावर केला. सात वेगवेगळ्या कॅलेंडर वर्षात २००० धावा करणारा विराट कोहली जगातील पहिला फलंदाज आहे. या वर्षीही कोहलीने एकूण २०४८ धावा केल्या. कोहलीने यापूर्वी २०१२ साली त्याने २१८६ धावा केल्या, २०१४ (२२८६ धावा), २०१६ (२५९५ धावा), २०१७ (२८१८ धावा), २०१८ (२७३५ धावा) आणि २०१९ (२४५५ धावा) धावा केल्या होत्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी असे कधीच घडले नव्हते.