scorecardresearch

Premium

Pakistan Team: हैदराबादमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी मारला बिर्याणीवर ताव, चाहत्यांबरोबर घेतले सेल्फी, पाहा Video

Pakistan Team on Hydrabadi Biryani: न्यूझीलंडविरुद्धच्या त्यांच्या पहिल्या सराव सामन्यानंतर, बाबर आझमच्या संघाने शानदार बिर्याणीचा आस्वाद घेतला आणि चाहत्यांबरोबर काही सेल्फीही काढल्या.

World Cup 2023: In Hyderabad Pakistani cricketers ate biryani took selfies with fans watch the video
बाबर आझमच्या संघाने शानदार बिर्याणीचा आस्वाद घेतला आणि चाहत्यांबरोबर काही सेल्फीही काढल्या. सौजन्य- (ट्वीटर)

Pakistan Team on Hydrabadi Biryani: एकदिवसीय विश्वचषक २०२३साठी भारतात आल्यापासून पाकिस्तान क्रिकेट संघ खरोखरच सर्व गोष्टींचा आनंद घेत आहे. हैदराबादमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या त्यांच्या पहिल्या सराव सामन्यानंतर, बाबर आझमच्या संघाने भव्य डिनरचा आनंद लुटला आणि चाहत्यांबरोबर काही सेल्फीही काढल्या. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी हैदराबादी बिर्याणीचा आस्वाद घेत येथेच्छ ताव मारला. जेव्हा पासून पाकिस्तानी संघाने भारतात पाऊल ठेवले आहे तेव्हापासून त्यांची खूप चंगळ सुरु आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत ट्वीटरवर टीम डिनरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, जिथे खेळाडू मजा करताना दिसतात. पाक क्रिकेट संघाने रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताच टाळ्यांच्या कडकडाटासह त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांना दिलेली वागणूक आणि जेवण पाहून पाकिस्तान क्रिकेट संघ भारताच्या आदरातिथ्याने खूपच प्रभावित झाला.

England vs New Zealand Oneday Cricket World Cup 2023
World Cup 2023: गोळीच्या वेगाने आलेल्या चेंडूवर, जो रूटने रिव्हर्स स्वीप मारत ठोकला शानदार षटकार, पाहा VIDEO
hansie cronje & bob woolmer
World Cup Cricket: मॅच सुरू असताना कोच-कॅप्टन यांच्यात इअरपीसद्वारे गुजगोष्टी; सामनाधिकाऱ्यांची कारवाई
A stunning comeback Shreyas Iyer's amazing catch by Shaun Abbott and the umpire gives not out Watch the video
IND vs AUS 2nd ODI: जबरदस्त पुनरागमन! श्रेयस अय्यरचा शॉन अ‍ॅबॉटने पकडला अप्रतिम झेल अन् अंपायरने दिले नॉटआऊट; पाहा Video
Kuldeep Yadav Brutally Trolled For Going To Bageshwar Dham Dheerendra Shastri Netizens Slam Asia Cup 2023 IND vs PAK Star
“कुलदीप यादवचं नशीब चमकतंय कारण..”, धीरेंद्र शास्त्रींबरोबरचे फोटो व्हायरल; नेटकऱ्यांची सडकून टीका

पाकिस्तानची वर्ल्डकपची चांगली सुरुवात झाली नाही आणि शुक्रवारी सराव सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ३४५ धावांची मोठी धावसंख्या उभारली. परंतु, त्यांच्या गोलंदाजांना लक्ष्याचा बचाव करता आला नाही. किवींनी अवघ्या ४३.४ षटकांत लक्ष्य गाठले. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवान (१०३), बाबर आझम (८०) आणि सौद शकील (७५) यांनी चांगली कामगिरी केली.

रिझवान म्हणाला, “शतक हे शतक असते, याचा मला अभिमान आणि आनंद आहे. शतक झळकावणे हे पाकिस्तानसाठी नेहमीच खास असते. भारतीय प्रेक्षकांनी आम्हाला विमानतळावरच भरभरून प्रेम दिले, जसे आमचे चाहते पाकिस्तानात आमच्यावर प्रेम करतात. आमचे जे स्वागत झाले त्यामुळे आम्ही खूप भारावून गेलो आहोत. टी२० आंतरराष्ट्रीय मध्ये मी पाकिस्तानसाठी सलामीला फलंदाजी करतो, कसोटीत मी ६-७व्या क्रमांकावर फलंदाजी करतो आणि एकदिवसीय मध्ये मी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. संघाला माझी गरज जिथे असेल त्यानुसार मी खेळतो.”

हेही वाचा: Asian Games 2023: चीनमध्ये घुमला महाराष्ट्राचा आवाज! मराठमोळ्या अविनाश साबळेची सुवर्णपदकाला गवसणी

१० पैकी ३ सराव सामने पावसामुळे रद्द झाले, उर्वरित ५ सामन्यांवरही पावसाचा धोका आहे

भारतीय क्रिकेट संघ तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफील्ड स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध आपला पुढील सराव सामना खेळणार आहे. विश्वचषक स्पर्धेची मुख्य स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे परंतु त्याआधी सर्व संघ सराव सामने खेळत आहेत. भारताचा मागील सराव सामना महत्त्वाचा होता कारण तो गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध होता पण पावसामुळे सामना होऊ शकला नाही. मागील ५ पैकी ३ सामने पावसामुळे रद्द झाला असून आगामी सामन्यांसाठीही हवामान चांगले नाही. भारत विरुद्ध नेदरलँड सामन्यासह अजून ५ सराव सामने खेळायचे आहेत, परंतु पावसामुळे या सामन्यांमध्येही व्यत्यय येऊ शकतो.

हेही वाचा: Asian Games: तजिंदरपाल सिंग तूरची ऐतिहासिक कामगिरी! एशियन गेम्समध्ये जिंकले सलग दुसरे गोल्ड मेडल, भारताच्या खात्यात एकूण ४५ पदके

हैदराबादमधील हवामान स्थिती

हैदराबादमध्ये परिस्थिती थोडी चांगली आहे. मंगळवारी येथे ढगाळ वातावरण असेल पण पावसाची शक्यता फारच कमी आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियासाठी ही चांगली गोष्ट आहे, कारण दोन्ही संघ मजबूत आहेत आणि सराव सामना महत्त्वाचा असेल. सकाळी येथे पावसाची शक्यता १० टक्के आहे जी जसजसा दिवस पुढे जाईल तसतसा कमी होईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World cup 2023 pakistani cricketers enjoyed biryani in hyderabad took selfies with fans watch video avw

First published on: 01-10-2023 at 19:37 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×