IND vs ENG 2nd Test Yashasvi jaiswal Ben Stokes Fight: भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबेस्टनमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. भारताने पहिल्या सत्रात २ विकेट्स गमावले पण ९८ धावाही केल्या आहेत. यशस्वी जैस्वालने आपला कमालीचा फॉर्म कायम राखत अर्धशतक झळकावलं. पण यादरम्यान स्टोक्स आणि जैस्वालमध्ये बाचाबाची पाहायला मिळाली.

इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारतीय संघाची प्लेईंग इलेव्हन कर्णधार शुबमन गिलने जाहीर केली. भारताची प्लेईंग इलेव्हन पाहून अनेकांनी संघावर टीका केली आहे. जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि साई सुदर्शन या खेळाडूंना विश्रांती देत नव्या ३ खेळाडूंना संघात घेतलं आहे. बुमराह ७ दिवसांच्या विश्रांती ही कसोटी खेळण्यासाठी उतरला पाहिजे होता असं अनेकांचं म्हणणं आहे. कारण भारतीय संघ आधीच मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. ही चर्चा सुरू असतानाच जैस्वाल-स्टोक्सने लक्ष वेधून घेतलं.

भारत-इंग्लंड सामन्यात यशस्वी जैस्वाल बेन स्टोक्स यांच्यात मैदानावर राडा पाहायला मिळाला. जैस्वाल कमालीची फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत होता. यादरम्यान बेन स्टोक्स गोलंदाजी करण्यासाठी आला. तेव्हा या दोन्ही खेळाडूंमध्ये वादावादी पाहायला मिळाली.

भारताच्या डावातील १७वे षटक टाकण्यासाठी स्टोक्स आला. स्टोक्सच्या षटकातील चौथ्या चेंडूवर जैस्वालने एक शानदार चौकार खेचला. यानंतर स्टोक्स आणि जैस्वालमध्ये ही वादावादी पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडू एकमेकांना डोळे दाखवत काहीतरी बोलताना दिसले. शाब्दिक चकमकही झाली आणि स्टोक्स रनअप घेण्यासाठी चालू लागला. स्टोक्स जैस्वालला स्लेजिंग करण्याचा प्रयत्न करत होता. पण जैस्वालने मात्र त्याला उत्तर देत सांभाळून खेळताना दिसला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यशस्वी जैस्वालने यानंतर २२व्या षटकात चौकारांची हॅटट्रिक लगावत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. जैस्वालने ५८ चेंडूत १० चौकारांसह ५३ धावा केल्या.