26 February 2021

News Flash

अतिरिक्त व्यायामामुळे काचबिंदू बळावण्याची शक्यता

काचिबदू हा डोळ्यांचा आजार असून तो बळावल्यास कायमस्वरूपी अंधत्व येण्याची भीती आहे.

| January 13, 2016 04:33 am

व्यायाम

डोळ्यावर अतिताण; अमेरिकी संशोधकांचा दावा

सध्याच्या धावपळीच्या युगात आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी योगा आणि व्यायामाचे विविध प्रकार करण्याकडे बहुतांश जणाचा कल असतो. अतिरिक्त व्यायामही आरोग्याला घातक असतो. काही योगासनांमध्ये डोके खाली करावे लागते, त्याशिवाय सूर्यनमस्कार, अतिरिक्त वजन उचलणे यांमुळे डोळ्यावर अतिरिक्त ताण पडतो. ज्या रुग्णांना ग्लुकोमा (काचबिंदू) हा विकार झालेला आहे, त्यांनी या व्यायामापासून जरा दूरच राहावे. कारण या व्यायाम प्रकारामुळे डोळ्यावर अतिताण येतो आणि काचबिंदू बळावण्याची शक्यता अधिक आहे, असे अमेरिकेतील संशोधकांनी सांगितले आहे.

काचिबदू हा डोळ्यांचा आजार असून तो बळावल्यास कायमस्वरूपी अंधत्व येण्याची भीती आहे. डोळ्यातील दृष्टीशी निगडित मंज्जातंतूवर द्रव स्वरूपातून येणाऱ्या ताणामुळे काचबिंदू हा आजार बळावतो. वैद्यकीय परिभाषेत सांगायचे झाल्यास ‘इलिव्टेडइन्ट्रोक्युलर प्रेशर’ (आयओपी) हा एकमेव घटक काचबिंदूवरील विघातक परिणांमासाठी कारणीभूत ठरतो.

न्यूयॉर्कमधील डोळे व कान रुग्णालयाच्या संशोधकांनी हे संशोधन केले. या संशोधकांनी डोळ्याशी निगडित कोणताही आजार नसलेल्या सदस्यांचा एक गट आणि काचबिंदू आजाराने पीडितांचा वेगळा गट तयार केला. त्याच्यांकडून योगासने आणि व्यायामाचे विविध प्रकार करवून घेण्यात आले. त्यात डोके खाली करणे, खाली वाकणे, सूर्यनमस्कार आदी व्यायामप्रकारामुळे डोळ्यावर ताण पडतो आणि काचबिंदू हा विकार बळावत असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले.

सांगितलेल्या व्यायाम प्रकारांनंतर प्रत्येक गटाच्या निर्धारित आयओपीची नोंद दोन मिनिंटाच्या कालावधीनंतर तात्काळ नोंदविण्यात आल्या आणि त्यानंतर पुन्हा दहा मिनिटांनी त्याच आसनस्थ स्थितीत त्याच व्यायामांच्या प्रकारांची पुनरावृत्ती करताना त्यांच्याही नोंदी घेण्यात आल्या. काचबिंदू असलेल्या रुग्णांना काही व्यायामप्रकारांनंतर डोळ्यांवर ताण आल्याचे जाणवले.

आरोग्यदायी जीवनशैलीसाठी डॉक्टर नेहमी रुग्णाला नियमित व्यायाम करण्यास सांगातात, पण अधिक वजन उचलणे, अतिरिक्त कसरत, सूर्यनमस्कार आणि डोके खाली करण्याचे व्यायाम यांमुळे काचबिंदू हा विकार बळावत असल्याने व्यायाम करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, असे डॉ. रॉर्बट रिच यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2016 4:33 am

Web Title: additional exercises will increase your glaucoma
Next Stories
1 डीव्हीडीमार्फत व्यायामाचे मार्गदर्शन घातक
2 आरोग्यदायी जीवनशैलीसाठी सामाजिक संबंध महत्त्वाचे
3 शाळा परिसरात जंक फूडला मज्जाव
Just Now!
X