News Flash

नेटफ्लिक्सने आणलं Downloads for You फिचर, जाणून घ्या सविस्तर

आपोआप डाउनलोड होणार आवडते सिनेमे-वेबसीरिज

दिग्गज व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने (Netflix) आपल्या युजर्ससाठी स्मार्ट डाउनलोड फिचर लाँच केलं आहे. नेटफ्लिक्सने “Downloads for You” नावाचं नवं फिचर आणलं आहे. या फिचरद्वारे तुम्ही तुमच्या आवडीचे सिनेमे किंवा वेबसीरिज डाउनलोड करु शकतात, त्यानंतर इंटरनेटशिवाय (ऑफलाइन) व्हिडिओ बघता येतील.

Downloads for You फिचरद्वारे नेटफ्लिक्सवरील तुमच्या ‘हिस्ट्री’वर आधारित सुचवलेले शो किंवा वेबसीरिज आपोआप डाउनलोड होतील. पण, या फिचरची मजा घेण्यासाठी तुम्हाला आधी हे फिचर ऑन करावं लागेल.

कसं करायचं ऑन ?
-ऑटोमॅटिक डाउनलोड फिचर सध्या केवळ अँड्रॉइडसाठी उपलब्ध आहे. आयफोन किंवा आयपॅडसाठी अजून प्रतीक्षा करावी लागेल.
-सर्वप्रथम नेटफ्लिक्सचं अँड्रॉइड अ‍ॅप ओपन करा
-आता Downloads च्या पर्यायावर क्लिक करा
-इथे तुम्हाला Downloads for You हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा
-आता तुम्हाला स्टोरेजबाबत विचारलं जाईल, त्यानंतर फिचर ऑन होईल

तुम्ही पाहिजे तेव्हा हे फिचर बंदही करु शकतात. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगणं गरजेचं आहे की इथे डाउनलोडिंग तुमच्या फोनच्या स्टोरेजमध्ये नाही तर नेटफ्लिक्स अ‍ॅपच्या स्टोरेजमध्ये होईल. नेटफ्लिकच्या अ‍ॅपमध्ये डाउनलोड मर्यादा 1GB, 3GB किंवा 5GB पर्यंत सेट करता येते. जेवढं जास्त स्टोरेज तितकं जास्त कंटेंट डाउनलोड होईल. नेटफ्लिक्स स्मार्ट डाउनलोड फिचर सध्या अँड्रॉइड फोनसाठी उपलब्ध आहे, लवकरच आयओएस प्लॅटफॉर्मसाठीही हे फिचर लाँच केलं जाण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2021 3:04 pm

Web Title: downloads for you netflixs latest feature automatically downloads shows based on what you like check details sas 89
Next Stories
1 Amazon चा Mahindra सोबत करार, आता इलेक्ट्रिक वाहन Treo Zor द्वारे होणार डिलिव्हरी
2 आता नेटवर्क नसतानाही करता येणार फ्री कॉलिंग, Vodafone Idea ने सुरू केली नवी सेवा
3 स्मार्टफोन मार्केटला मिळाला नवीन ‘किंग’, चार वर्षांमध्ये पहिल्यांदाच Samsung ला झटका
Just Now!
X