सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook ने ‘फेक न्यूज’ रोखण्यासाठी पावलं उचलायला सुरूवात केली आहे. यासाठी कंपनीने आपल्या चॅटिंग अ‍ॅप Messenger मध्ये काही बदल केले आहेत. फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅपप्रमाणे Messenger अ‍ॅपमध्येही मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी मर्यादा निश्चित केली आहे.

एकावेळी पाच जणांनाच फॉरवर्ड करता येणार मेसेज :-
यानुसार आता Facebook Messenger मध्ये युजर्सना एक मेसेज जास्तीत जास्त पाच जणांना किंवा पाच ग्रुपमध्येच फॉरवर्ड करता येणार आहे. 24 सप्टेंबरपासून मेसेंजरसाठी हे नवीन फीचर कंपनीकडून रोलआउट केलं जाणार आहे.  “फॉरवर्ड मेसेज शेअर करण्यासाठी मर्यादा ठेवणं हा फेक किंवा खोट्या बातम्यांवर आळा घालण्याचा परिणामकारक मार्ग आहे, याद्वारे खोटी माहिती वेगाने व्हायरल होणार नाही”, असं फेसबुकने म्हटलं आहे. “जागतिक स्तरावर करोना महामारीदरम्यान फेक आणि चुकीच्या माहितीवर आळा घालणं एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाहीये. पण, तरीही फेसबुक फेक न्यूज रोखण्यासाठी प्रयत्न करत आहे”, असं फेसबुक मेसेंजरचे प्रोडक्ट मॅनेजर आणि डायरेक्टर Jau Sullivan यांनी गुरूवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये नमूद केलं.

Mahindra Bolero Neo Plus SUV launch
Force Citiline, Gurkha 5-door विसरुन जाल! टोयोटानंतर आता महिंद्राने देशात दाखल केली ९ सीटर SUV कार, किंमत…
Do not come to ask for votes placards from onion growers in Malwadi
मत मागण्यासाठी येऊ नये, माळवाडीत कांदा उत्पादकांकडून फलक
father of the year Viral Video Man Seen Shopping While Pushing his Babies Strollers on trolley
शेवटी वडिलांनाच लेकरांची काळजी! तीन चिमुकल्यांना ट्रॉलीवर बसवण्यासाठी तारेवरची कसरत, पाहा VIDEO
How To Save Electricity Bill Through Cooler
उन्हाळ्यात कुलरमुळे येणारं वीज बिल कमी करण्यासाठी कमाल जुगाड; प्लास्टिकच्या बाटलीचा ‘असा’ वापर करुन पाहा अन् पैसे वाचवा

अमेरिका आणि न्यूझीलंडमध्ये निवडणूक :-
यावर्षी अमेरिका आणि न्यूझीलंडमध्ये निवडणूक होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून निवडणूकांमध्ये सोशल मीडियाद्वारे पसरणाऱ्या फेक न्यूज मोठा मुद्दा ठरत आहे. अशात फेसबुकने फेक न्यूजला रोखण्यासाठी हे नवीन फीचर आणलं आहे. यापूर्वी 2018 मध्ये व्हॉट्सअ‍ॅपची मालकी असलेल्या फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅपसाठी फॉरवर्ड मेसेज फीचर आणलं होतं , त्यानंतर हे फीचर यावर्षी जानेवारीमध्ये ग्लोबल मार्केटमध्ये सादर करण्यात आलं आहे. त्यानंतर आता फेसबुकच्या मेसेंजरवरही मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी मर्यादा आली आहे.