News Flash

FAUG Game: अवघ्या 24 तासांमध्ये डाउनलोडिंगचा आकडा 10 लाखांपार

FAU-G बाबत गेमप्रेमींमध्ये 'क्रेझ'...

FAUG Game: अवघ्या 24 तासांमध्ये डाउनलोडिंगचा आकडा 10 लाखांपार

जवळपास चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ‘मेड इन इंडिया गेम’ FAU-G (Fearless and United Guards) प्रजासत्ताक दिनी भारतात लाँच झाला. कालपासून (दि.26) हा गेम गुगल प्ले-स्टोअरवर डाउनलोडसाठी उपलब्ध झाला. प्ले-स्टोअरवर उपलब्ध झाला असला तरी अद्याप हा गेम आयफोन युजर्ससाठी लाँच झालेला नाही, त्यामुळे आयफोन युजर्सना FAU-G खेळण्यासाठी अजून वाट बघावी लागणार आहे.

लाँचिंगआधीपासूनच FAU-G बाबत गेमप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळत होती. लाँच होण्यापूर्वीच 50 लाखांपेक्षा जास्त जणांनी या गेमसाठी प्री-रजिस्टर केलं होतं. त्यानंतर आता प्ले-स्टोअरवरील आकडेवारीवरुन अवघ्या 24 तासांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त युजर्सनी हा गेम डाउनलोड केल्याचं समोर आलं आहे. 460 MB साइज असलेल्या या गेमला युजर्सकडून प्ले-स्टोअरवर 4.7 रेटिंग मिळाली आहे.

भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर लोकप्रिय ऑनलाइन बॅटल रॉयल गेम PUBG भारतात बॅन झाला. त्यानंतर FAU-G गेमची घोषणा झाली होती. अखेर हा गेम आता उपलब्ध झाला आहे. nCore गेमिंग नावाच्या एका भारतीय कंपनीने हा गेम डेव्हलप केला असून अभिनेता अक्षय कुमार गेमला प्रमोट करत आहे.

भारतीय सैनिकांवर आधारित :-
FAU-G गेमच्या पहिल्या टीझरवनरुन हा गेम भारत-चीन सैन्यामध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावर आधारित असेल हे समोर आलं होतं . पण, आता पूर्ण गेम-प्ले भारतीय सैन्याशीच निगडीत असेल हे स्पष्ट झालंय. गेममधील खेळाडूंना FAU-G कमांडो म्हटलं जाईल, धोकादायक क्षेत्रांमध्ये गस्त घालणाऱ्या सैनिकांची ही तुकडी असेल.

टक्कर कोणाला ?
हा गेम बेंगळुरूच्या nCore Games आणि बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने डेव्हलप केला आहे. गेमचा पहिला टीझर 25 ऑक्टोबर रोजी आला होता, त्याच महिन्यात गेम लाँच करण्यात येणार होता. पण त्यानंतर गेमची लाँचिंग पुढे ढकलल्यात आली. काही दिवसांमध्ये भारतात पुन्हा येऊ घातलेल्या PUBG Mobile India गेमसोबत FAU-G ची टक्कर असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2021 1:01 pm

Web Title: faug crosses 1 mn downloads on google play store in less than 24 hours sas 89
Next Stories
1 फेसबुक युजर्सच्या फोन नंबरचा ‘सेल’; 50 कोटी युजर्सचा डेटा झाला लीक, 61 लाख भारतीयांना फटका
2 10,999 रुपयांमध्ये Poco M2 Pro खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या ऑफर
3 BSNL Republic Day 2021 Offers: 398 रुपयांचा नवीन प्लॅन झाला लाँच, दोन रिचार्जची व्हॅलिडिटीही वाढली
Just Now!
X