03 March 2021

News Flash

Flipkart Big Saving Days Sale : अनेक स्मार्टफोन्सवर मिळेल बंपर डिस्काउंट

फ्लिपकार्टने केली Big Saving Days sale ची घोषणा...

(प्रातिनिधिक छायाचित्र)

ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने आपल्या Big Saving Days sale ची घोषणा केली आहे. 6 ऑगस्टपासून या सेलला सुरूवात होईल. पाच दिवसांच्या या सेलमध्ये अनेक स्मार्टफोनवर शानदार ऑफर्स व डील्स मिळतील. फ्लिपकार्टने या सेलसाठी Citibank आणि ICICI Bank यांच्यासोबत भागीदारी केली आहे. याअंतर्गत ग्राहकांना स्मार्टफोनच्या खरेदीवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल.

या सेलमध्ये iPhone XR, Oppo Reno 2F, iPhone SE आणि Redmi K20 Pro यांसारख्या फोनवर डिस्काउंट मिळेल. याशिवाय Motorola Razr foldable फोनवरही 20,000 रुपयांची सवलत आहे. iPhone XR हा फोन फ्लिपकार्टच्या सेलमध्ये आठ हजार रुपयांच्या डिस्काउंटसह 44,999 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. या फोनच्या खरेदीवर कंपनीकडून एक्स्चेंज ऑफर व काही बँकांच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरही डिस्काउंटची ऑफर असेल. तर, 23 हजार 490 रुपयांचा Oppo Reno 2F स्मार्टफोन सेलमध्ये 17,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. जवळपास 5,500 रुपये डिस्काउंट ग्राहकांना मिळेल.

याशिवाय, 42,500 रुपयांचा iPhone SE 2020 स्मार्टफोन 36 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. तसेच, Redmi K20 Pro या स्मार्टफोनच्या 6 जीबी + 128 जीबी व्हेरिअंटची किंमत सेलमध्ये 26,999 रुपयांऐवजी 22,999 रुपये आहे. म्हणजेच फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डे सेलमध्ये रेडमी के20 प्रो स्मार्टफोनवर 4,000 रुपयांची बचत होईल. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये 1 लाख 24 हजार 999 रुपये किंमत असलेल्या Motorola Razr (2019) स्मार्टफोनवरही ग्राहकांची 20,000 रुपये बचत होऊ शकते. याव्यतिरिक्त Oppo Reno 10X Zoom, iPhone 7 Plus, आणि iQOO 3 या स्मार्टफोनवरही सेलमध्ये आकर्षक डिस्काउंट आहे. या सेलबाबत माहिती देणारं एक पेज कंपनीच्या वेबसाइटवर लाइव्ह झालं आहे. त्यामध्ये सेलमधील डिस्काउंटबाबतची सर्व माहिती मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2020 4:29 pm

Web Title: flipkart big saving days sale begins on august 6 check top deals on iphone xr oppo reno 2f iphone se and more sas 89
Next Stories
1 किंमत 15 हजारांपेक्षा कमी, Poco M2 Pro स्मार्टफोनसाठी ‘या’ तारखेला सेल
2 फाइल शेअरिंगसाठी आलं ‘मेड इन इंडिया’ अ‍ॅप, Share It पेक्षाही जास्त स्पीड; 17 वर्षांच्या मुलाची कमाल
3 Google Pixel 4a स्मार्टफोन आज होणार लाँच, स्वस्त iPhone ला देणार टक्कर?
Just Now!
X