माहितीचा बादशाह असलेल्या गुगलने बुधवारी बोलो अॅप लाँच केले आहे. प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या लहान विद्यार्थ्यांना हिंदी आणि इंग्रजी भाषा शिकण्यास या अॅपमुळे मदत होणार आहे. हे अॅप सध्या फक्त भारतात लाँच करण्यात आले आहे. या अॅपमध्ये आवाज ओळख आणि टेक्स्ट-टू-स्पीच तंज्ञनाचा वापर करण्यात आला आहे. या अॅपचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थांना फायदा होणार आहे. उत्तरप्रदेशमधील २०० गावांमध्ये या अॅपची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे.

या अॅपमध्ये एक अॅनिमेटेड डिजिटल असिंटड देण्यात आली असून तिचे नाव दिया असे आहे. दिया मुलांना हिंदी आणि इंग्रजीमधून गोष्टी आणि इतर गोष्ट वाचण्यास प्रोत्साहित करणार आहे. जर मुलगा वाचताना एखादा शब्द अडखळला तर दिया तो शब्द योग्य पद्धीतने उचार करण्यास मदत करणार आहे. या अॅपमुळे विद्यार्थांच्या मनातील इंग्रजीविषयीची भिती नाहीसी होणार आहे, अशी माहिती गुगल इंडियाचे उत्पादक नितिन कश्यप यांनी दिली.

हे अॅप फक्त ५० एमबीचे असून प्लेस्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. बोलो अॅपमध्ये हिंदी आणि इंग्रजीच्या ५० गोष्टी आहेत. हे अॅप सध्या फक्त अँड्रायड मोबाईलमध्ये वापरता येईल. भविष्यामध्ये मराठीसारख्या इतर भारतीय भाषांचा यामध्ये समावेश करण्याचा विचार सुरू असल्याचे कश्यर यांनी सांगितले.