Motorola कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन Motorola One Fusion+ खरेदी करण्याची आज (दि.20) चांगली संधी आहे. विचार करत असाल तर आज(दि.20) चांगली संधी आहे. 64MP कॅमेरा सेन्सर असलेल्या या फोनसाठी फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर दुपारी 12 वाजेपासून सेल सुरू होत आहे. सेलमध्ये या फोनच्या खेरदीवर काही आकर्षक ऑफरही आहेत. मोटोरोला वन फ्यूजन प्लस (6 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज) ची भारतात किंमत 17 हजार 499 रुपये असून ट्विलाइट ब्लू आणि मूनलाइट व्हाइट अशा दोन कलरच्या पर्ययांमध्ये हा फोन उपलब्ध आहे.
ऑफर्स :-
एसबीआयच्या क्रेडिट कार्डद्वारे Motorola One Fusion+ खरेदी करणाऱ्यांना 5 टक्के कॅशबॅकची ऑफर मिळेल. तसेच, Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डवर आणि Axis Bank Buzz क्रेडिट कार्डद्वारे हा फोन खरेदी करणाऱ्यांनाही 5 टक्के सवलत मिळेल. याशिवाय दर महिन्याला 1,945 रुपये नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही आहे.
स्पेसिफिकेशन्स :-
ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असलेल्या Motorola one fusion+ फोनला 6.5 इंच फुल-एचडी+ (1,080×2,340 पिक्सल) नॉच-लेस डिस्प्ले आहे. अँड्रॉइड 10 वर कार्यरत असलेल्या या फोनमध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 730जी चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी ऐड्रेनो 618 जीपीयू आहे. इंटर्नल स्टोरेज माइक्रोएसडी कार्डद्वारे तब्बल 1 टीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे. फोनच्या रिअर पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फोनमध्ये डेडिकेटेड गुगल असिस्टंट बटणही दिलं आहे. मोटोच्या या चार कॅमेऱ्यांच्या फोनमध्ये मुख्य कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. तर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेन्स, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. तर, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. याशिवाय फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही या फोनमध्ये आहे.