News Flash

भारतात 1000 पेक्षा जास्त इंजिनिअर्सची भरती करणार PayPal, टॉप कॉलेजेसमधून होणार निवड

देशातील टॉपच्या इंजिनिअरींग कॉलेजमधून भरतीची योजना

(संग्रहित छायाचित्र - Reuters )

दिग्गज डिजिटल पेमेंट्स कंपनी PayPal भारतात आपला व्यवसाय विस्तारण्याच्या तयारीत असून लवकरच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. एक हजारापेक्षा जास्त इंजिनिअर्सची २०२१ मध्ये म्हणजे याच वर्षी भरती केली जाईल, असं कंपनीकडून बुधवारी सांगण्यात आलं.

ही भरती कंपनीच्या बंगळुरु, चेन्नई आणि हैदराबाद येथील इंडिया डेव्हलपमेंट सेंटर्ससाठी होईल. या तीन शहरांतील डेव्हलपमेंट सेंटर्समध्ये सॉफ्टवेअर, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, रिस्क एनालिटिक्स आणि बिजनेस एनालिटिक्ससाठी भरती होईल असं कंपनीकडून सांगण्यात आलं.  एंट्री, मिड-लेवल आणि सीनियर रोल्स अशा पदांसाठी हे भरती होईल. देशातील टॉपच्या इंजिनिअरींग कॉलेजमधून भरतीची योजना असल्याची माहितीही कंपनीकडून देण्यात आली.

सध्या या तीन शहरांतील इंडिया टेक्नॉलॉजी सेंटर्समध्ये 4.5 हजारापेक्षा जास्त कर्मचारी काम करत असल्याचं कंपनीने सांगितलं. शिवाय, भारतातील टेक्नॉलॉजी सेंटर अमेरिकेबाहेरील PayPal चं सर्वात मोठं सेंटर आहे असही कंपनीने नमूद केलं. तसेच, करोना महामारीमुळे डिजिटल पेमेंटकडे वळणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे, त्यामुळे याकडे जास्त लक्ष्य केंद्रीत करण्याची गरज निर्माण झाली असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 9:47 am

Web Title: paypal to hire over 1000 engineers for india development centres in 2021 sas 89
Next Stories
1 ३० मिनिटात बनवा प्रोटीन युक्त लाडू
2 7000mAh बॅटरीच्या Samsung Galaxy F62 वर वाचवा 2,500 रुपये; जाणून घ्या पूर्ण ऑफर
3 Samsung ची नवीन सेवा, लॅपटॉपवरुन पाठवता येणार SMS
Just Now!
X