News Flash

Jio ची भन्नाट ऑफर, दोन दिवसांसाठी फ्री मिळतोय अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगही

कंपनीने नव्या ऑफरला Unlimited 2days by Reliance Jio असे नाव दिले आहे.

रिलायन्स जिओची ब्रॉडबँड सर्व्हिस Jio Fiber च्या युजर्ससाठी गुड न्यूज आहे. कंपनी आपल्या युजर्सना दोन दिवसांसाठी मोफत अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग आणि डेटाची सेवा देत आहे. पण गॅजेट्स360 च्या वृत्तानुसार, जिओ फायबर्सची ही ऑफर काही निवडक ग्राहकांसाठीच आहे.

कंपनीने नव्या ऑफरला Unlimited 2days by Reliance Jio असे नाव दिले आहे. ही ऑफर तुमच्या अ‍ॅक्टिव्ह प्लॅनसोबत मिळेल. ऑफरनुसार, युजर्स दोन दिवस अमर्यादित कॉलिंग आणि डेटाचा वापर करु शकतात. याशिवाय प्रीमियम OTT अ‍ॅप्सची सेवाही मिळेल. विशेष म्हणजे या दोन दिवसांमध्ये जो डेटा वापराल त्याची अॅक्टिव्ह प्लॅनमधून कपात केली जाणार नाही. ग्राहकांना एसएमएसद्वारे अतिरिक्त डेटाची माहिती दिली जात आहे. तुम्हाला अतिरिक्त डेटा मिळाला आहे की हे तुम्ही Myjio अ‍ॅपमधून MyPlans सेक्शनमध्ये चेक करु शकतात.

मोबाइल युजर्सना 2GB मोफत डेटा :-
रिलायन्स जिओ आपल्या मोबाइल युजर्सनाही अशाप्रकारे दररोज 2 जीबी डेटा फ्री देत आहे. सलग चौथ्या महिन्यात कंपनीकडून अखेरच्या चार दिवसांसाठी दररोज 2 जीबी फ्री डेटा दिला जात आहे. यापूर्वी मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यातही कंपनीने ही ऑफर आणली होती. यामध्ये निवडक ग्राहकांना रोज 2 जीबी डेटा म्हणजे एकूण 8 जीबी डेटा अगदी मोफत दिला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 4:20 pm

Web Title: reliance jio fiber offering free two day unlimited calls and data to select users sas 89
टॅग : Reliance Jio
Next Stories
1 महामारी व पावसाळ्यात आरोग्य विमा निवडताना या गोष्टी करणार मदत
2 दर तासाला तब्बल एक लाख वेळेस डाउनलोड, ‘टिकटॉक’वरील बंदी ‘चिंगारी’च्या पथ्यावर
3 दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी ठरली Airtel , पण ‘या’ कंपनीने गमावले लाखो ग्राहक
Just Now!
X